गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 17 मे 2023 (08:21 IST)

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामलेंची निवड

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड झाली.मराठी नाट्यपरिषदेच्या निवडणूकीचा निकाल आज जाहीर झाला.यामध्ये नाट्य परिषद कार्यकारणीवर रंगकर्मी पॅनलचा झेंडा फटकल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी दिली.
 
नवनाथ कांबळी यांचा पराभव करत प्रशांत दामले प्रचंड बहुमताने निवडून आले.कार्यकारिणीमध्ये तेरा पैकी अकरा सदस्य निवडून आलेत.सहकार्यवाहपदी तीन पदे होती त्यासाठी सहा उमेवार होते.त्यात इंदूलकर समीर, पोरके दिलीप आणि ढगे सुनील यांच्या नावाचा समावेश आहे.तर कार्यकारिणीमध्ये तेरा पैकी अकरा सदस्य निवडून आले आहेत. त्यात संजय देसाई, मालपेकर सविता, रेगे दीपक, सुशांत शेलार, शिंगाडे विशाल, विजय साळुंके, चौगुले विजय, महाजन गिरीष, संजय राहते, क्षिरसागर दीपा, पाटील संदीप यासह इतर सदस्यांचा समावेश आहे.

Edited By - Ratnadeep ranshoor