गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 19 जानेवारी 2023 (08:31 IST)

’वाळवी’ सारखा चित्रपट मराठीत झालाच नाही

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर हे ते त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात.याचबरोबर चित्रपटांबद्दल भाष्य करताना दिसतात.नुकतंच अमेय खोपकर यांनी एक ट्वीट करत वाळवी चित्रपटाविषयी त्यांचे मत व्यक्त केले आहे. तसेच हा चित्रपट आवर्जून पहावा असे आवाहनही केले आहे.
 
अमेय खोपकरांचे ट्वीट
‘वाळवी’ हा चित्रपट प्रत्येक चित्रपटरसिकाने आवर्जून पहावा असा आहे.इतका उत्कंठावर्धक चित्रपट आजवर मराठीत झालाच नाही.लेखन,दिग्दर्शन,अभिनय अशा प्रत्येक बाबतीत या चित्रपटाने अव्वल कामगिरी केलेली आहे.परेश मोकाशी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं अगदी मनापासून खूप खूप अभिनंदन करत हॅश टॅग #ZeeStudios केला आहे.
 
Edited by :  Ratnadeep Ranshoor