मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 डिसेंबर 2022 (14:32 IST)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत Akshay Kumar चा Firs tLook

बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी मराठी चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. अक्षयच्या या चित्रपटात तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. वेडात मराठे वीर दौडले सात असे या मराठी चित्रपटाचे नाव असून याचे शूटिंग सुरू झाले आहे. खुद्द अक्षयने त्याच्या इंस्टाग्रामवर ही माहिती दिली आहे. या चित्रपटात अक्षय अतिशय गंभीर भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटातील अक्षयचा फर्स्ट लूकही रिलीज झाला आहे. ज्यामध्ये अक्षय छत्रपती शिवाजी महाराजांच्या गेटअपमध्ये येत आहे. अक्षयचा हा लूक खूपच आकर्षक दिसत आहे.
 
अक्षय त्याच्या या भूमिकेबद्दल खूप उत्सुक आहे. व्हिडिओ शेअर करण्यासोबतच त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, आज मी वेडात मराठे वीर दौडले सात या मराठी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. यात मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारता आली हे माझे भाग्य आहे. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आणि माँ जिजाऊंच्या आशीर्वादाने मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. 
 
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनीही अक्षयच्या या चित्रपटाबद्दल ट्विट केले आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार छत्रपती शिवाजीच्या भूमिकेत असल्याचे लिहिले आहे. आजपासून चित्रपटाला सुरुवात झाली आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर असून निर्माते वसीम कुरेशी आहेत.