बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 15 जानेवारी 2022 (17:46 IST)

किरण माने यांनी घेतली शरद पवारांची भेट, प्रकरणाला नवं वळण

राजकीय टीका केल्यामुळे स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या लोकप्रिय मालिकेत अभिनेते किरण माने यांना मालिकेतून बाहेर काढून टाकण्यात आलं. यामुळे खळबळ उडाली आहे. सर्वच स्तरातून या प्रकाराचा निषेध होत असताना अनेक नेत्यांनी त्यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान किरण माने यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. 
 
किरण माने यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे भेट घेतली. भेटीत किरण यांना अचानक मालिकेतून काढून टाकल्या बाबत चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. विशिष्ट पक्षाविरोधात लिहिल्यामुळे काढून टाकल्याचा किरण माने यांचा आरोप आहे.
 
शरद पवार यांच्या भेटीनंतर किरण माने यांनी एका चॅनलशी संवाद साधला.  त्यात त्यांनी सांगितले की मला भेटीसाठी अर्धा तास देण्यात आला पण ही भेट सुमारे दीड तास चालली. यावेळी मी त्यांना माझी राजकीय भूमिका तसेच माझ्यावर महिलेने केलेल्या तक्रारीसंदर्भातील सर्व पुरावे दाखवले. त्यांनी माझं बोलणं शांतपणे ऐकलं. मी त्यांच्यासमोर माझी बाजू मांडली असून मला त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा नाही. पण आता ते हे सर्व कशा पद्धतीने मांडतात हे बघयाचे असे किरण माने यांनी सांगितले.