शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 25 डिसेंबर 2021 (13:02 IST)

मराठी अभिनेत्री हृता दुर्गुळे हिचा साखरपुडा संपन्न

छोट्या पडद्यावरील मराठी अभिनेत्री हृता दुर्गुळे हिचा साखरपुडा दिग्दर्शक प्रतीक  शाह यांच्याशी झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यांना दोघांना हृताच्या चाहत्या प्रेक्षकांनी शुभेच्छा दिल्या आहेत . काही दिवसांपासून हृता आणि प्रतीकच्या साखरपुड्याच्या बातम्या येत होत्या. आज त्यांचा साखरपुडा मोठ्या थाटा माटाने संपन्न झाला. हृता ही  सोशल मीडियावर नेहमी एक्टिव असते. तिने आपल्या सोशल मीडियावर मेंदीचे फोटो शेअर केले होते. त्यामुळे तिच्या चाहत्यांना लग्न आहे की  साखरपुडा असे प्रश्न पडले होते. आता साखरपुड्याचे फोटो पाहून चाहत्यांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.हृता आणि प्रतीकला तिच्या चाहत्यांनी आणि कलाकार मंडळींनी शुभेच्छा दिल्या आहेत.