सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018 (10:59 IST)

‘ठाकरे’ चित्रपटाचे डबिंग सुरु

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ या चित्रपटाचे डबिंग सुरु झाले असून नवाजुद्दीनने स्वत: याबाबत ट्विट करत माहिती दिली. इतकेच नाही तर नवाजने हे ट्विट चक्क मराठीमध्ये केले.
 
या ट्विटमध्ये त्याने मराठीमध्ये लिहीले आहे, ” माझ्या समस्त भावांनो आणि भगिनींनो, आजपासून डबिंगची सुरुवात केली आहे.” असे म्हटले.   बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी नवाजुद्दीनचे नाव नक्की झाल्यावर हिंदी अभिनेता मराठी कसे बोलणार अशी चर्चा सर्वत्र रंगताना दिसत होती. त्याबाबत नवाजला अनेक प्रश्नही विचारण्यात आले होते. त्यावेळी तो म्हणाला होता, मी सगळ्यांना खात्रीनं सांगतो की बाळासाहेब ठाकरेच मला मराठी बोलण्याची प्रेरणा देतील, आशीर्वाद देतील आणि त्यांची लाडकी भाषा मराठी माझ्यावर तेवढंच प्रेम करेल.’