शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019 (11:39 IST)

'थियेटर ऑफ रेलेवन्स-संविधान संवर्धन नाट्य जागर' दोन दिवसीय नाट्य महोत्सव व चर्चा सत्र

27 वर्षांआधी म्हणजे 12 ऑगस्ट, 1992 रोजी ‘थिएटर ऑफ़ रेलेवंस’ नाट्य सिद्धांताचे सूत्रपात झाले होते. त्यावेळी जागतिकीकरणाचा अजगर प्राकृतिक संसाधनांना गिळंकृत करण्यासाठी आपला फणा जगभरात पसरवत होता. भांडवलशाही ने जगाला ‘खरेदी आणि विक्री’ पर्यंत मर्यादित केले होते.
 
भांडवलशाही सत्तेच "जागतिकीकरण" हे ‘विचाराला कुंद, खंडित आणि मिटवण्याचे षड्यंत्र आहे. तंत्राच्या रथावर स्वार होऊन विज्ञानाच्या मूळ संकल्पनांचा विनाश करण्याचा कट रचत आहे. मानव विकासासाठी पृथ्वी आणि पर्यावरणाचा विनाश, प्रगतिशीलतेला केवळ सुविधा आणि उपभोगामध्ये बदलण्याचा खेळ आहे. फॅसिस्ट ताकदीचे परिणाम आहे जागतिकीकरण ! लोकतंत्र, लोकतांत्रीकरणाच्या संविधानिक परंपरांची खिल्ली म्हणजे “जागतिकीकरण”! अशा भयावह काळात माणुसकी टिकवणे एक आव्हान आहे... या आव्हानासमोर उभे आहे “थिएटर ऑफ रेलेवंस’ नाट्य सिद्धांत.
 
“थिएटर ऑफ़ रेलेवंस” 27 वर्षांपासून फॅसिस्टवादी ताकदिंशी झगडत आहे. जागतिकीकरण आणि फॅसिस्टवादी शक्ती ‘स्वराज्य आणि समता’ या विचारांना उद्धवस्त करून समाजात विकार निर्माण करतात ज्याने संपूर्ण समाज ‘आत्महीनतेने’ ग्रासित होऊन हिंसक होऊन जातो. हिंसा मानवतेला नष्ट करते आणि कला मनुष्यात ‘माणुसकीचा’ भाव जागृत करते. कला, जी माणसाला माणुसकीचा बोध देते… कला ती जी माणसाला माणूस बनवते !
 
1990 चा काळ देश जग आणि मानवतेसाठी आमुलाग्र परिवर्तनाचा काळ होता.
 
एक ध्रुवीय घटनांनी भारताच्या उत्पादन क्षमतांना नष्ट करण्याची सुरुवात केली. आपल्या हक्कांची मागणी करणारे ६६ हजार मिल कामगारांना भांडवलदारी षडयंत्रा अंतर्गत कामावरून काढण्यात आले आणि मिलवर टाळा लावण्यात आला. मुंबईला सिंगापूर आणि शांघाय बनवण्याचा कट रचला गेला आणि त्याचेच परिणाम आज मिलच्या जागेवर ‘मॉल’ आणि ‘टॉवर’ उभे आहेत.
 
अशा बिकट आणि संकटसमयी जनतेला अशा मंचाची गरज होती जो त्यांना अभिव्यक्त होण्याची संधी देईल. जो त्यांच्यातच राहून त्यांच्या मताला जनमानसात पोहचवेल. आणि यासाठी एका रंगचिंतनाची सुरुवात झाली, एका नवीन रंग सिद्धातांची सुरवात झाली. या रंग सिद्धांताने भांडवलशाहीच्या शोषण आणि दडपशाहीचा ‘कलेसाठी कला' या भ्रमाचा कट उघडकीस आणला आणि नवीन रंग तत्व जगासमोर ठेवले.
 
12 ऑगस्ट 1992 ला “थिएटर ऑफ़ रेलेवंस” या नाट्य तत्वज्ञानाची सुरवात झाली आणि याच्या अंमलबजावणीतील आव्हाने समोर आली. भांडवलशाहीच्या शोषणाच्या पद्धती आहेत, ती नेहमी धर्म, अज्ञान, राष्ट्रवाद आणि अन्य रुढीवादी परंपरा अंतर्गत आपले पाय पसरवते. भारतीय संविधानातील सर्वात पवित्र आणि भारताच्या अस्तित्वासाठी आधारभूत असलेला सिद्धांत “सेकुलरवादाला” उघडपणे आवाहन दिले आणि धार्मिक कट्टरवादयांच्या उन्मादी गर्दीने बाबरी (मस्जिद)चा साचा कोसळवला. देश व मुंबई जातीय दंगलीच्या आगीत होरपळले. अश्या वेळी लोकतांत्रिक व्यवस्थेचा आवाज म्हणजेच ‘मीडिया’ सुद्धा भांडवलशाहीच्या कुशीत जाऊन आपला फायदा कमावत असते, तर “थिएटर ऑफ रेलेवेंस” नाट्य सिद्धांत राष्ट्रीय आव्हानांना फक्त स्वीकारच नाही करत, तर राष्ट्रीय एजेंडा पण ठरवते.
 
अशा नाजूक काळात थिएटर ऑफ रेलेवन्स च्या प्रतिबद्ध कलाकारांनी आपल्या जीवावर खेळून मुंबईच्या कानाकोपऱ्यात जाऊन 'दूरसे किसीने आवाज दी' ह्या नाटकाचे प्रयोग केले. हा शोषण, हिंसा आणि धार्मिक कट्टरवादी ह्यांच्या विरोधात दीर्घ संघर्षाचा लहान विजय होता. ह्या विजयाने कलाकारांमध्ये आणि त्यांच्या कलात्मक सिद्धांतात विश्वास निर्माण केला आणि थिएटर ऑफ रेलेवन्स ह्या सिद्धांताला जन मान्यता मिळाली.
'थिएटर ऑफ़ रेलेवंस' चे सिद्धांत  -
 
१. असा रंगकर्म ज्याची सृजनशीलता विश्वाला मानवीय आणि सुंदर बनवण्यासाठी प्रतिबद्ध आहे .
 
२. कला कलेसाठी न राहता समाजाच्या प्रति आपल्या जबाबदारीचे पालन करेल आणि लोकांच्या जीवनाचा हिस्सा बनेल.
 
३. जो मानवीय गरजांना पूर्ण करेल आणि स्वतःला अभिव्यक्ती माध्यमाच्या स्वरूपात व्यक्त करेल.
 
४. जो स्वतःला परिवर्तनाच्या माध्यमाच्या स्वरुपात शोधेल.. आणि रचनात्मक बदलावाची प्रक्रिया पुढे नेईल.
 
५. असा रंगकर्म जो मनोरंजनाची सीमा तोडून जीवन जगण्याचे स्त्रोत किंवा पद्धती बनेल.
 
"थिएटर ऑफ़ रेलेवंस" ने जीवनाला नाटकाशी जोडून रंग चेतनेचा उदय करून या तत्वाला लोकांशी जोडले आहे.आपल्या नाट्यकार्यशाळेतून सहभागींना मंच, नाटक आणि जीवनाशी संबंध, नाट्य,लेखन, अभिनय, दिग्दर्शन, समीक्षा, नेपथ्य, रंगशिल्प, रंगभूषा इत्यादी विभिन्न रंग दृष्टीकोनांवर प्रशिक्षित केले आहे आणि कलात्मक क्षमतेला दैवीय देणगी वरून हटवुन वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे वळवले आहे.27 वर्षात 16 हजारा पेक्षा जास्त रंगकर्मींनी 1000 कार्यशाळेत भाग घेतला आहे. भांडवलदारी कलाकार कधीही आपली कलात्मक सामाजिक जबाबदारी घेत नाहीत त्यामुळे "कलेसाठी कला" या चक्रव्यूहात फसले आहेत. "थिएटर ऑफ़ रेलेवंस" ने "कलेसाठी कला" असणा-या साम्राज्यवादी आणि भांडवलदारी विचारांच्या चक्रव्यूहाला आपल्या तात्विक आणि सार्थक प्रयोगांनी तोडले आहे आणि हजारो संकल्पनांना रुजवले आहे आणि अभिव्यक्त केले आहे.
 
थिएटर ऑफ रेलवन्स नाट्यतत्वावर आधारित नाट्य चळवळ मधे रूपांतरित झालेले नाटकं खालील प्रमाणे:
 
1) जागतिकीकरणाने जगाच्या जैविक आणि भौगोलीक विविधतेला नष्ट केले आणि करत आहे. याचा चेहरा फार विद्रूप आहे. या विद्रूपतेच्या विरुद्ध नाटक "बी -७" ने "थिएटर ऑफ़ रेलेवंस" ची आपली वैश्विक हुंकार भरली आणि सन 2000 मध्ये जर्मनीत याचे प्रयोग केले.
2) मानवता आणि प्रकृतीच्या नैसर्गिक संसाधानाच्या खाजगीकरणाच्या विरूद्ध सन 2013 मध्ये नाटक "ड्रॉप बाय ड्रॉप वाटर" यूरोप मध्ये प्रस्तुत केले. नाटक "ड्रॉप बाय ड्रॉप वाटर"  पाण्याच्या खाजगीकराणाला फक्त भारतातच नाही तर जगाच्या कोणत्याही भागात विरोध करते ..पाणी आपला नैसर्गिक आणि जन्मसिद्ध अधिकार आहे .खाजगीकरणासाठी आंधळ्या होत चाललेल्या सरकारी तंत्राला हे समजणे गरजेचे आहे.
3) मनुष्य ला मनुष्य म्हणून जगण्यासाठी "गर्भ" नाटकाचे प्रस्तुतीकरण केले . हे नाटक मानव जातीतल्या संघर्ष आणि मानवतेची स्पष्ट माहिती देते . हे नाटक एक मानवीय जीवन जगण्याच्या आव्हानांशी संबंधित आहे.
4) कलाकारांना कठपुतली बनवणा-या ह्या आर्थिक तंत्रातून कलाकारांच्या मुक्तीसाठी नाटक “अनहद नाद - अन हर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स” कलात्मक चिंतन आहे, जे कला आणि कलाकाराच्या कलात्मक गरजा, कलात्मक मूलभूत प्रक्रियांना समजण्याची ( आत्म शुद्ध करणारी) प्रक्रिया आहे. कारण कला उत्पाद आणि कलाकार उत्पादक नाही आणि आयुष्य फायदा आणि तोटा मोजणारे बैलेंस शीट नाही ,म्हणून हे नाटक कला आणि कलाकार ह्यांना उत्पाद आणि उत्पादीकरणातून उन्मुक्त करते व त्यांच्या सकारात्मक, सृजनात्मक आणि कलात्मक उर्जे पासून उत्कृष्ठ आणि सुंदर विश्व बनवण्यासाठी प्रेरित आणि प्रतिबद्ध करते.
5) नाटक "राजगति" सत्ता, व्यवस्था, राजनैतिक चरित्र आणि राजनीती' ची गति आहे. राजनीति ला पवित्र नीति मानत आहे. राजनीति घाणेरडी आहे या भ्रमाला तोडून राजनीति मध्ये जन सहभागितेची मागणी करते. ‘माझे राजनीतीशी घेणं देणं काय' सामान्य जनतेच्या या अवधारणेला दिशा देते. सामान्य जनता लोकशाहीचे पहारेकरी आहेत आणि पहारेकरी आहेत तर सामान्य जनतेचा सरळ सरळ राजनीतीशी संबंध आहे. नाटक 'राजगति' समता, न्याय, मानवता आणि संवैधानिक व्यवस्थेच्या निर्माणासाठी ‘राजनैतिक परिदृश्याला' बदलण्याची चेतना जागवते. ज्याने आत्महीनतेचा भाव उध्वस्त होऊन ‘आत्मबळाने' प्रेरित ‘राजनैतिक नेतृत्वाचा' निर्माण व्हावा.
6) अर्ध्या लोकसंख्येचा आवाज. पितृसत्तात्मक व्यवस्थेच्या शोषणा विरुद्ध हुंकार, न्याय आणि समतेची गाज, नाटक आहे, “न्याय के भंवर में भंवरी”!
7) नाटक – “मैं औरत हूँ !” – आपल्या असण्याची , त्याला स्वीकारण्याची आणि आपल्या "अस्तित्वाला" विभिन्न स्वरूपात पडताळण्याची , शोध घेण्याची एक यात्रा आहे. नाटक ‘मैं औरत हूँ!’ पितृसत्तात्मक भारतीय समाजाची मानसिकता , बंधन , परम्परा , समज यांना मुळापासून नाकारते आणि त्यांना खुले आवाहन देऊन स्वतःचे ‘स्वतंत्र मानवीय अस्तित्व’ स्वीकारते . हे नाटक महिला व पुरुषाला बरोबरीच्या आरशात न पाहता ‘स्त्री’ च्या ‘स्वतंत्र मानवीय अस्तित्वाला' रेखांकित आणि अधोरेखित करते.
8) सांप्रदायिक मुद्द्यावर ‘दूर से किसी ने आवाज़ दी’,
9) बाल मजुरी वर ‘मेरा बचपन’,
10) घरगुती हिंसेवर ‘द्वंद्व’,
11)‘लिंगनिदान’ या विषयावर नाटक ‘लाडली’ ,
12) शेतकऱ्यांची आत्महत्या आणि शेतीच्या होणाऱ्या विनाशावर ‘किसानों का संघर्ष’
14) पर्यावरण
 
“थिएटर ऑफ रेलेवन्स” 27 वर्षांपासून कुठल्याही सरकारी, नीम सरकारी, कॉर्पोरेटफंडिंग किंवा कोणत्याही देशी विदेशी अनुदानावर अवलंबून नाही. सरकारच्या 300 ते 1000 करोड च्या अनुमानित संस्कृति संवर्धन बजेटच्या विरुद्ध 'प्रेक्षक' सहभागितेने उभे आहे ! थिएटर ऑफ रेलेव्हन्स रंग सिद्धांतानुसार प्रेक्षक हाच सर्वात मोठा आणि शक्तिशाली रंगकर्मी.