‘विक्की वेलिंगकर’ ६ डिसेंबर २०१९ रोजी होणार प्रदर्शित

spruha joshi
Last Modified गुरूवार, 17 ऑक्टोबर 2019 (16:44 IST)
अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार व प्रणय चोकसी आणि डान्सिंग शिवा प्रस्तुत मराठी चित्रपट ‘विक्की वेलिंगकर’ या चित्रपटातील सोनाली कुलकर्णी आणि ‘मास्क मॅन’ यांचा वेगळा लुक काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता, त्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून नुकतेच निर्मात्यांनी सिनेमाचे नवीन पोस्टर प्रदर्शित केले आहे. यातून एक नवीन चेहरा प्रेक्षकांच्या समोर आला आहे. या पोस्टरमध्ये
सुप्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी दिसत असून तिचा वेगळा लूक पाहायला मिळत आहे. ‘विक्की वेलिंगकर’ हा मराठी चित्रपट ६ डिसेंबर २०१९ रोजी होणार प्रदर्शित होणार असून या चित्रपटात स्पृहा जोशीची देखील मुख्य भूमिका प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

‘विक्की वेलिंगकर’ ही कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा असून तो एक घड्याळ विक्रेता आहे. आयुष्यातील एका अनपेक्षित अशा गूढतेशी या व्यक्तिरेखेचा सामना होतो. या चित्रपटाची नायिका ही आपल्या सर्व आव्हानांवर आणि अडचणींवर मात करत खंबीरपणे उभे राहते, तिची ही कथा आहे, त्याचबरोबर स्पृहा जोशी या चित्रपटामध्ये विद्या नावाचे पात्र साकारत असून ‘ती विक्कीला वाचवू शकेल?' या आशयाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. यामुळे प्रेक्षकांना स्पृहा जोशीच्या पात्राला ‘वेळेचे गणित विद्याला सोडवता येईल का’ असे अनेक प्रकारचे प्रश्न पडले आहेत. नक्की स्पृहाची भूमिका काय आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना ६ डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागेल’ असे उद्गार चित्रपटाचे दिग्दर्शक सौरभ वर्मा यांनी काढले. त्यांनी यापूर्वी ‘मिकी व्हायरस’ आणि ‘7 अवर्स टू गो’ आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

‘जीसिम्स’चे अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार म्हणतात, ‘स्पृहा जोशी ही एक गुणी अभिनेत्री असून या चित्रपटामध्ये ती एका वेगळ्या लुक आणि भूमिकेमध्ये प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे आणि तिची ही भूमिका प्रेक्षकांना देखील नक्की आवडेल यात काही शंका नाही.

सोनाली कुलकर्णी ही या चित्रपटामध्ये मध्यवर्ती भूमिकेत दिसणार असून तिच्याबरोबर स्पृहा जोशी देखील या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. स्पृहा जोशी यापूर्वी बाबा, होम स्वीट होम, मोरया, देवा, पेइंग गेस्ट, मला काहीच प्रॉब्लेम नाही यांसारख्या चित्रपटामध्ये झळकली होती.

आपल्या भूमिकेविषयी बोलताना स्पृहा जोशी म्हणाली की “मला सौरभ वर्मा यांची कथा सांगण्याची शैली मला खूप आवडली. ज्या प्रकारे ते कथा सांगत होते त्यावरून या चित्रपटाची कथा खूप वेगळी आहे आणि या कथेत असं काही आहे की जे मी या आधी कधीही पाहिलेलं नाही. कथा ऐकल्यानंतर माझ्या भूमिकेची लांबी किती आहे याचा मी विचार केला नाही कारण मला माहित आहे की विक्की वेलिंगकरच्या कथेत विक्की ही विद्या शिवाय अपूर्ण आहे. मला ही भूमिका साकारताना खूप मज्जा आली आणि मला असं वाटतंय की प्रेक्षकांनाही ही भूमिका बघताना खूप चांगला अनुभव येईल.”

सौरभ वर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती जीसिम्सचे अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार तसेच प्रणय चोकसी, डान्सिंग शिवा प्रॉडक्शनचे अनुया चौहान कुडेचा, रितेश कुडेचा आणि लोकीज स्टुडीओचे सचिन लोखंडे आणि अतुल तारकर यांची आहे.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

मनीषा कोइराला 'मस्का' सिनेमात दिसणार

मनीषा कोइराला 'मस्का' सिनेमात दिसणार
अभिनेत्री मनीषा कोइराला 'मस्का' सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

बीग बींने केले शिवाजी महाराजांना नमन

बीग बींने केले शिवाजी महाराजांना नमन
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. ...

मृण्मयी प्रतिभा देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित ‘मन फकीरा’ ...

मृण्मयी प्रतिभा देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित ‘मन फकीरा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित...
आजच्या तरुणाईच्या संकल्पना, भावना यातून आकाराला आलेला, तरुणाईनेच साकारलेला आणि तरुणांच्या ...

जय शिवराय

जय शिवराय
६५ किलोची तलवार वागवतो त्याचे नाव येसाजी​ दोन हजार श त्रुंशी एकटा झुंज देतो त्याचे नाव ...

राम गोपाल वर्माची पुढच्या चित्रपटाची तयारी सुरु

राम गोपाल वर्माची पुढच्या चित्रपटाची तयारी सुरु
बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हैद्राबादमधील पशुवैद्यक तरुणीवर झालेल्या बलात्कार आणि ...