1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : बुधवार, 23 ऑगस्ट 2023 (11:52 IST)

Heath Streak:हिथ स्ट्रीकच्या मृत्यूची बातमी खोटी असल्याचे हेन्री ओलांगा ने ट्विट केले

Heath Streak Is Alive: झिम्बाब्वे संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी अष्टपैलू खेळाडू हिथ स्ट्रीक यांचे वयाच्या 49 व्या वर्षी कर्करोगाने निधनाची बातमी सम्पूर्ण जगभरात वेगाने पसरली. स्ट्रीकच्या मृत्यूची बातमी देणाऱ्या त्याचे माजी सहकारी हेन्नी ओलांगाने स्वतः ट्विट करत स्ट्रीक जिवंत असल्याची बातमी दिली आहे. त्यांनी आधी स्ट्रीक गेल्याची बातमी दिली होती. की हिथं स्ट्रीक आता या जगात नाही. त्याच्या आत्म्यास शांती लाभो. आता त्यांनी हिथं स्ट्रीक जिवंत असल्याचे ट्विट करून पूर्वीचे ट्विट डिलीट केले आहे.

त्याने नवीन ट्विट करत लिहिले आहे की, मी पुष्टी करतो की हिथं स्ट्रीकच्या मृत्यूची बातमी वेगानं पसरली. मी आत्ताच त्यांच्याशी बोललो ते जिवंत आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी अफवा आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी ते कर्करोगाने ग्रस्त असून त्यांचा उपचार साऊथ आफ्रिकेत सुरु आहे. असे सांगितले आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit