ऋतुराज गायकवाड T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला
पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात गुवाहाटी येथे खेळला जात आहे, ज्यामध्ये पाहुण्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. गत सामन्याचे नायक यशस्वी जैस्वाल आणि इशान किशन स्वस्तात बाद झाले आणि एकूण 24 धावांपर्यंत भारताचे दोन विकेट पडल्या होत्या.
यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवसह रुतुराज गायकवाडने डावाची धुरा सांभाळली. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी झाली. सूर्या 39 धावा करून बाद झाला. यानंतर, गायकवाडने तुफानी फलंदाजी करत 57 चेंडूत 13 चौकार आणि सात षटकारांसह 123* धावा केल्या. त्याचे हे टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक होते.
रुतुराज गायकवाड ऑस्ट्रेलिया विरुद्ध T20 मध्ये शतक झळकवणारा पहिला भारतीय फलन्दाज ठरला. त्याने भारतासाठी दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या केली. T20 फॉर्मेट मध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या करण्याचा विक्रम शुभमन गिलच्या नावावर आहे. त्याने न्यूजीलँडविरुद्ध नाबाद 126 धावांची खेळी खेळली.
गायकवाडच्या शतकाच्या जोरावर भारताने 3 गडी गमावून 222 धावा केल्या. गायकवाड यांच्या आक्रमक खेळीबाबत ट्विटरवर जबरदस्त प्रतिक्रिया येत आहेत.
Edited by - Priya Dixit