बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 जुलै 2017 (08:52 IST)

कोहलीने लावला विनिंग सिक्स, भारताने मॅचसोबत मालिकेवर केला कब्जा

वेस्ट इंडिजविरुद्धचा अखेरचा सामना ८ गडी राखून जिंकत भारताने पाच सामन्यांची मालिका ३-१ ने जिंकली आहे. सुरुवातीला बसलेल्या धक्क्यानंतर टीम इंडिया काहीशी सावरली. अजिंक्य रहाणे आणि विराट कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी करत संघाला चांगली धावसंख्या उभारुन दिली.  कर्णधार विराट कोहलीने शतक झळकवत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला . विराटला कार्तिकने चांगली साथ दिली. विराट कोहली १११ धावांवर नाबाद राहिला,  तर दिनेश कार्कितने ५० धावांची महत्वपूर्ण खेळी केली. विराट कोहलीला सामनावीर तर अजिंक्य रहाणे याला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.