1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: गुरूवार, 4 ऑगस्ट 2016 (09:28 IST)

थायलंडमध्ये चक्क कंडोमचे म्युझियम

सध्याच्या काळात लज्जा हा शब्द तसा दुङ्र्कीळच झाल्यामुळे तुम्ही कितीही सोज्वळपणाचा आव आणला तरी, ‘त्या’वेळी तुम्ही सर्व काही विसरून कंडोम आणण्यासाठी जाताच. कारण सुरक्षित लैंगिक संबंध ही काळाची गरज आहे. 
 
तुम्हाला आज आम्ही कंडोमच्या अशा एका ठिकाणाबद्दल सांगणार आहोत, जेथे तुम्हाला जगभरातले सर्व प्रकारचे कंडोम पाहायला मिळतील.
 
आपल्या आगळ्या वेगळ्या सौंदर्याबद्दल जगभरात थायलंड प्रसिद्ध आहे. दरवर्षी येथे जगभरातील लाखो पर्यटक हजेरी लावून जातात. पण तुम्हाला माहीत आहे का, थायलंडमध्ये सर्वात जास्त उत्पादन कशाचे घेतले जाते. 
 
थायलंडमध्ये सर्वात जास्त उत्पादन हे कंडोमचे घेतले जाते. महत्त्वाचे म्हणजे थायलंड आरोग्य मंत्रालयाने सुरक्षित लैंगिक संबंधांबाबत लोकांमध्ये जागरूकता निङ्र्काण व्हावी यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळेच थायलंडमध्ये कंडोमचे म्युझियम उभारण्यात आले आहे. अल्पावधीतच हे म्युझियम प्रेक्षकांच्या पसंतीचे एक महत्त्वाचे ठिकाण बनले आहे.