शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

सोळा श्रृंगार केल्यावरच मिळतो पुरुषांना या मंदिरात प्रवेश

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे अनेक परंपरा असून त्या मनापासून जपल्याही जातात. अशीच एक अगळीवेगळी परंपरा असलेल्या मंदिराविषयी जाणून घेऊया..
 
केरळमधील कोल्लम जिल्ह्यात कोट्टनकुलंगरा श्रीदेवी एक अनोखे मंदिर आहे. या मंदिरात पुरुषांना प्रवेश करण्यास बंदी आहे. मात्र तरीही पुरुष मंदिरात प्रवेश करतात, पण तो पुरुष म्हणून नाही तर स्त्री बनून. देवीच्या पूजेची ही परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे. 
 
देवीच्या या अनोख्या उत्सवात प्रवेश करण्यासाठी पुरुषांना फक्त स्त्रियांची कपडेच परिधान करावी लागत नाहीत तर त्यांना सोळा श्रृंगारही करावा लागतो. यानंतरच ते देवीची पूजा करुन चांगली नोकरी आणि कुटुंबाच्या सुख-शांती-समृद्धीसाठी प्रार्थना करतात. या मंदिरात देवी प्रकट झाल्याचे येथील लोकांची मान्यता आहे. तसेच हे एकच असे मंदिर आहे की, याला वरील छत नाही. मंदिरात प्रत्येकवर्षी 23 आणि 24 मार्चला चाम्याविलक्कू उत्सव साजरा केला जातो.