सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: लंडन , मंगळवार, 27 सप्टेंबर 2016 (12:04 IST)

23 किलोची कोबी

कार्नवेलमध्ये राहणार्‍या या शेतकर्‍याचे डेव्हिड थॉमस असे नाव असून यंदाच्या नॅशनल जॉइंट व्हेजिटेबल चॅम्पियनशीपमध्ये त्याने आपल्या शेतात पिकविलेला २३.२ किलो वजनाचा कोबी सादर केला. थॉमसने सांगितले की, 'बीच बॉल'च्या आकाराच्या या विशाल कोबीचे उत्पादन घेतल्याचा आपल्याला अतिशय अभिमान वाटत आहे. यापूर्वी १९२५मध्ये स्टेव्हिलेच्या डर्बीशायरमधील आर स्ट्रॉ याने १९.0५ किलोंच्या कोबीचे उत्पादन घेतले होते. नॅशनल जॉइंट व्हेजिटेबल चॅम्पियनशिपचे अधिकृत परीक्षक मार्टिन डेव्हिस यांनी सांगितले की, डेव्हिस थॉमने जगातील सर्वात वजनदार कोबीचा जागतिक विक्रम तब्बल चार किलोपेक्षा जास्त वजनाच्या फरकाने मोडला आहे आणि याचा आम्हाला आनंद आहे. अर्थात गिनीज वर्ल्ड रेकॉर्डतर्फे यासंबंधी अद्याप पुष्टी करण्यात आलेली नाही.