शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

सर्वात विशाल मांजर!

ऑस्ट्रेलियातील एका दाम्पत्याकडे जगातील सर्वात विशाल आकाराची मांजर आहे. ही मांजर खरेदी केली तेव्हा ती एवढी मोठी होऊन जगातील सर्वात मोठी मांजर बनेल, याचा त्यांना जराही अंदाज नव्हता.
 
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसच्या चमूने त्यांच्यासोबत संपर्क साधला तेव्हा ते थक्कच झाले. ओमर नावाची ही मांजर अतिशय छोटी होती तेव्हा हे दाम्पत्य तिला घरी घेऊन आले होते. त्यानंतर तिचा आकार वाढतच गेला. तिची पशुप्रेमी असलेली मालकीण स्टेफी हिस्ट्र हिने तिच्या शरीराचे मोजमाप घेतले.
 
एका वर्षात ही मांजर 22 एलबीएसने वाढली होती. काही दिवसांपूर्वीच स्टेफीने ओमरची छायाचित्रे इंस्टाग्रामवर शेअर केली असून तेव्हापासून तिची लोकप्रियता वाढतच आहे. ओमरचा दिनक्रम ठरलेला आहे. त्यात सकाळी पाच वाजता उठणे, नाष्टा करणे, फिरण्यास जाणे व तिथून आल्यानंतर आराम करणे. यात सहसा बदल होत नाही. खाण्यामध्ये तिला कांगारूचे मास पसंत आहे. तिची झोप काउचवर पूर्ण होते.
 
विशाल शरीरामुळे तिला झोपण्यासाठी जास्त जागा लागते. इंस्टाग्रामवर आता ओमरला लाखोंमध्ये पोहोचली आहे, लोक तिची छायाचित्रे दणादण शेअर करत असून एखाद्या सेलेब्रिटीप्रमाणे तिची लोकप्रियता आहे.