गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

काय माश्यांनाही ओठ असतात?

हिंदी महासागरामध्ये शास्त्रज्ञांनी एक अनोख्या माशाचा शोध लावला असून त्याला चक्क ओठ आहेत. माशांच्या सहा हजारांपेक्षा जास्त प्रजातींमधून शास्त्रज्ञांनी हा मासा शोधून काढला आहे. या माशाचे ओठ सात इंच लांब असून ते मजबूत पेशींपासून बनलेले असतात. त्याचे ओठ वरच्या बाजूने मशरूमप्रमाणे दिसतात. आतापर्यंत कोणत्याही माशामध्ये अशा प्रकारचे ओठ दिसून आलेले नाहीत.
ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटीतील जीवशास्त्रज्ञ व्हिक्टर यांनी सांगितले की माशाची एक अनोख्या प्रकाराची प्रजात आहे. शास्त्रज्ञांनी स्कॅनिंग इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर करून या माशाच्या ओठांच्या स्नायूंचा संरचनेचा शोध घेण्यासाठी त्याचा खातेवेळचा व्हिडिओ बनविला आहे. शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच माशाच्या ओठांची संरचना समजण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्याच्या ओठांची क्षमता समजली जाऊ शकेल.
 
कोरल समुद्री जीवामध्ये आढळून येणारा पातळ श्लेष्म अर्थात चिकट पदार्थ असलेला हा मासा वेगवान आहे. त्याच्यामध्ये टोचणार्‍या पेशीही आहेत. कोय स्टिंगिंग पेशींमुळे ओठांचे संरक्षण केले जाऊ शकते. शास्त्रज्ञांनी सांगितले की या माशाच्या ओठाचे बल वाढण्यास कारणीभूत ठरणार घटक त्यांना कोरलच्या पृष्ठभागावर आढळून आला. हे कोरल श्लेष्म आणि टोचणार्‍या पेशींना पकडणार्‍या वाहक पट्टयाच्या रूपात काम करण्यास मदत करते.