रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

शास्त्रज्ञांनी शोधल्या बेडाकाच्या सात नव्या प्रजाती

भारतीय शास्त्रज्ञांनी पाच वर्षांच्या अथक शोधानंतर छोट्या बेडकाच्या सात नव्या प्रजातींचा शोध लावला आहे. हे बेडूक आकाराने एवढे छोटे आहेत की लहान मुलाच्या अंगठ्याच्या नखावरही मावू शकतात. गुप्त अधिवास आणि किड्यांसारखा आवाज यामुळे त्यांच्याकडे यापूर्वी दुर्लक्ष झशले होते, असे दिल्ली विद्यापीठातील दोन संशोधकांनी केलेल्या अभ्यासात म्हटले आहे.
 
या अभ्यासाचे नेतृत्व करणारे प्रोफेसर एस डी बिजू यांनी सांगितले की हे बेडूक छोट्या भौगोलिक प्रदेशातील असल्यामुळे संशोधनाचे निष्कर्ष अत्यंत म्हत्त्वपूर्ण आहेत. वाघ आणि हत्ती यासारख्या मोठ्या प्राण्यांसह या छोट्या उभयचर जीवांचे संरक्षणही गरजेचे आहे. पश्चिम घाटातील बेडकांपैकी एक तृतीयांश प्रजाती विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. नव्या सात प्रजातींपैकी पाच प्रजातींही धोक्यात असून त्यांचे तातडीने जतन करण्याची गरज आहे.
 
या प्रजाती बेडकांच्या इतर प्रजातींहून भिन्न आहेत. इतर बेडूक केवळ रात्री सक्रिय असतात, परंतू या प्रजातींचे बेडूक दिवस तद्वतच रात्रीही सक्रिय असतात.
 
नव्या सात प्रजातींपैकी चार प्रजाती 12.2 ते 15.4 मिलिमीटर एवढ्या लांबीच्या आहेत, असे ते म्हणाले. या जंगलात मोठ्या संख्येने हे बेडूक आढळून येतात. आकाराने खूपच लहान असल्यामुळेच कदाचित कोणाचे आतापर्यंत त्यांच्याकडे लक्ष गेले नसावे. हे बेडूक मोठ्या संख्येने आहेत. तथापि, त्यांचे भवितव्य अंधकारमय आहे.
 
हे बेडूक वेगवेगळ्या नाही तर एकाच भागात दिसून आले. अनेक बेडूक तर त्यांच्या अधिवासापासून दूर शेतात आणि बागांमध्ये आढळून आले. मानवी वावर असल्यामुळे या जागा त्यांच्यासाठी असुरक्षित ठरू शकतात.