शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By Author रूपाली बर्वे|
Last Updated : गुरूवार, 30 जून 2022 (14:00 IST)

हनुमान चालिसाच्या विरोधामुळे तर संकट नाही ओढवलं !

navneet rana uddhav Thackeray
आपल्या निवासस्थानी हनुमान चालीसाचे पठण ही चांगली गोष्ट नव्हती का? मात्र प्रत्युत्तर म्हणून शिवसेना कार्यकर्त्यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांचा विरोध झाला, त्यांना अटक करण्यात आली. खर्‍या अर्थाने श्रद्धेने हनुमान चालीसाचे पठण घरासमोर होऊ देणे ही देखील भाग्याची गोष्ट होती. पण आश्चर्य म्हणजे पवित्र पाठ यात देखील राजकारण शिरलं आणि हनुमंत नाराज झाले असावे...
 
नवनीत राणा जेव्हा 'मातोश्री'समोर हनुमान चालीसा पठण करण्याची जिद्द करत होत्या तेव्हा ठाकरे यांनी त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी तंबू ठोकून सावली देत चहा-नाश्त्याची व्यवस्था केली असती तर...
 
ही राजकीयदृष्ट्या 'हास्यास्पद' घटना अलीकडेच घडली आणि महाराष्ट्राला संकटपासून वाचवण्यासाठी संकट मोचनची स्तुती करण्यासाठी मातोश्रीला भक्तांची टोळी पोहचण्यापूर्वीच त्यांना माघार घ्यावी लागली..
 
येथे 'राजकीय संधी' चा फायदा न करून घेण्याची चूक घडली. येथे शक्ती प्रदर्शन करण्याऐवजी हिंदूंचे कौतुक करण्याची उद्धव ठाकरेंनी मोठी संधी गमावली. नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा पठण करून त्यांना त्यांच्या घरासमोर बसवण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी आनंदाने स्वीकारला असता तर राज्यातील हिंदू देखील आनंदीच झाले असते.
 
पण अनेकवेळा अभिमानाच्या लढाईत नेते आपले राजकीय नुकसान करतात, उद्धव ठाकरेंनीही तेच केले... उलट पाहुणचार करून आपण आपल्या धर्माप्रती निष्ठ असण्याचे उदाहरण मांडता आलं असतं.
 
संकट कटे मिटे सब पीरा , जो सुमिरै हनुमत बलबीरा
म्हणजेच जो भक्त महावीर हनुमानाचे चिंतन करतो, त्याचे सर्व संकट आपोआपच दूर होतात आणि सर्व दुःखांचाही नाश होतो. 
 
कुणास ठाऊक सरकारवरील संकट देखील टळले असते...