वर्‍हाडींना मिळाले हेल्मेट गिफ्ट!

helmet
मानपान आणि बडेजाव बाजूला ठेवून एका विवाहाच्या स्वागत समारंभात आलेल्या पाहुणे मंडळींना चक्क हेल्मेट वाटप करण्यात आले.

नाशिक शहरात रंगलेला हा छोटेखानी स्वागत समारंभाचा सोहळा चर्चेचा विषय ठरला. डॉ राजेंद्र आणि मायादेवी साबद्रा यांची कन्या प्रियदर्शना आणि नाशिकामधील उद्योजक हरीश आणि वंदना गोगड यांचा मुलगा ऋषभ यांनी 19 एप्रिल रोजी रजिस्टर पद्धतीने विवाह केला.

जवळचे नातलग आणि स्नेहीजनांसाठी गंगापूर रोडलगतच्या एका लॉन्समध्ये स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या संपूर्ण सोहळ्यालाच सामाजिक बांधिलकी लाभल्याने हा सोहळा आगळावेगळा ठरला. जैन समाजात विवाह सोहळ्यांवर वारेमाप खर्च केला जात असला तरी वर आणि वधूकडील मंडळींनी या खर्चाला फाटा देऊन तो पैसा सामाजिक कार्यासाठी देऊ केला.
या विवाह सोहळ्यात लग्नपत्रिकेचा खर्च टाळण्यात आला. निमंत्रितांना व्हॉट्स अॅपद्वारेच निमंत्रण पाठविण्यात आले. भूज भूकंपग्रस्तांसाठी काम करणार्‍या पन्नालाल सुराणा यांच्या आपले घर या सामाजिक संस्थेत सध्या 268 मुले-मुली आहेत. त्यापैकी चार मुलींच्या लग्नाचा खर्च या लग्नात ‍वाचविलेल्या पैश्यातून करण्यात येईल.

तसेच स्वागत समारंभात आलेल्या 500 निमंत्रितांना हेल्मेटचा वाटप करण्यात आले. समारंभात कोणतेही गोड पदार्थ न ठेवता शेतकर्‍यांकडून खरेदी केलेल्या द्राक्षाच्या पेट्या निमंत्रितांना वाटण्यात आल्या.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

गॅलरीतून खाली डोकावून पाहत असताना तोल गेल्याने 12 वर्षाच्या ...

गॅलरीतून खाली डोकावून पाहत असताना तोल गेल्याने 12 वर्षाच्या बालकाचा मृत्यू
लहान मुलांकडे झालेलं दुर्लक्ष त्यांच्या जीवावर बेतू शकतं, याचं आणखी एक उदाहरण समोर आलं ...

प्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण

प्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण
प्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. उपचारासाठी त्यांना ...

मुंबईत खळबळ! मुकेश अंबानींच्या बंगल्यासमोर सापडली जिलेटीनने ...

मुंबईत खळबळ! मुकेश अंबानींच्या बंगल्यासमोर सापडली जिलेटीनने भरलेली कार
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील मलबार हिल परिसरातील अँटीलिया ...

मुंबईत 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

मुंबईत 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार
मुंबई येथील भाईंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 17 वर्षीय मुलीवर तिघांनी सामूहिक बलात्कार ...

ग्रामीण भागातील बांधकामांबद्दल ग्रामविकास मंत्री यांनी ...

ग्रामीण भागातील बांधकामांबद्दल ग्रामविकास मंत्री यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ३ हजार २०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या भुखंडावरील ...