संबंधित माहिती
- weight loss : वजन कमी करण्यासाठी जिर्याच्या चहासोबत मध आणि लिंबूचे करा सेवन
- अटलबिहारी बाजपेयी यांच्या नावाने सुरू झालेल्या या योजनेत गुंतवणूक केल्यास तुमचे म्हातारपण आरामात जाईल
- Weight Loss: कोणते पेय वजन कमी करण्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत? करा आहारात समाविष्ट
- चहा विक्रेत्याची मुलगी बनली आंतरराष्ट्रीय वेटलेफ्टर विजेती
- Bad Food Combination with tea: या गोष्टी चहासोबत कधीही खाऊ नका, अन्यथा तुम्हाला होईल त्रास
सण असो की समारंभ, पेय हेच खरं!
लावली चटक गोऱ्यानी चहाची,
काळा माणूस करू लागला चाकरी त्याची,
हळूहळू करता झाला सवयी चा गुलाम,
चहा विना आता त्याच्या जीवनात न उरला राम,
सकाळ असो की संध्याकाळ, लागतोच चहा,
उरलेले नाही चहा विन त्याच्या आयुष्यात पहा,
सर्वच क्षणी त्याची उपस्थिती असतेच बरं,
सण असो की समारंभ, पेय हेच खरं!
काळा असला तरी चालेल बाबा!असें म्हणणारे,
दिवसातून कप च्या कप आहेत ढोसणारे!
वादळ ही येतात म्हणे चहाच्या कपातले!
इतका मिसळून गेलाय तो, भाग्य आपुले,
असो पण अर्ध्या कपात ही जीं कता येतं माणसाला,
ही किमया फक्त आणि फक्त जमली चहाच्या कपाला !!
समस्त चहा शौकींनांना समर्पित!!☕
......अश्विनी थत्ते
