बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मंगळवार, 15 सप्टेंबर 2020 (10:03 IST)

एका असंतोषाचा जनक

आज महाविकास आघाडीबद्दल लोकांमध्ये असंतोष पसरलेला आहे. हे सरकार बर्‍याच पातलीवर नापास झालेलं आहे असं एक चित्र दिसत आहे. हे चित्र भविष्यात कदाचित बदलेल ही ! मी साहित्यिक, कवी असल्यामुळे शक्यतो राजकीय विषयांवर लिहित नाही आणि त्याकडे लक्षही देत नाही. आपण आपलं साहित्य विश्वात वावरायचं. पण लहान भावासारखा माझा मित्र जयेश मेस्त्री हा साहित्यिक असूनही राजकीय लिखाण करतो. वडील केईएम रुग्णालयात कोरोनासाठी उपचार घेत असताना व स्वतः सबंध कुटुंबासोबत क्वारंटाईन असताना जयेशने एक लेख लिहिला "महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाशी झुंजत असताना असताना " नीरो घंटा वाजवत होता". मला वाटतं या लेखामुळे महाराष्ट्राच्या मनात असलेला काहीसा असंतोष बाहेर पडला.
 
वर म्हटल्याप्रमाणे मी राजकीय गोष्टीत हस्तक्षेप करत नाही. पण हा लेख मी माझ्या मित्रासाठी लिहितोय, तुमच्या जयेशदादा मेस्त्रींसाठी लिहितोय... एकतर हे लादलेलं सरकार आहे असा जनतेचा समज आहे त्यात या सरकारने हवी तशी कामगिरी केली नसल्यामुळे व कोरोना काळात कोणत्याही कारणाने सपशेल नापास 
ठरल्यामुळे, त्यात विकासकामांना स्थगितीमालिका लावल्यामुळे या सरकारबद्दल लोकांना राग होताच. पण तो राग, ती चिड आतल्या आत दबलेली होती. दोन महिन्याआधी महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यात पूर्णपणे अडकला असताना, लोक प्रचंड घाबरले असताना कुणीतरी लोकांचा आवाज होण्याची गरज होती... ते काम जयेशने केलं... तो लेख लिहिल्यानंतर सरकारच्या समर्थकांनी जयेशवर नको नको ते बालंट लावले, त्याच्या वडिलांना दुषणे दिले. दुर्दैवाने जयेशचे वडील वारले. त्याही परिस्थितीत तो लेखणी चालवत होता. महाराष्ट्राला वार्‍यावर सोडलंय की काय अशी परिस्थिती असताना सव्वा पाच फुटांचा जयेश मेस्त्री पुढे आला आणि वडील वारले असताना व स्वतः कोरोना पेशेंट असताना त्याने मरगळलेल्या महाराष्ट्राला नवसंजीवनी दिली. #कोरोना_डायरीज ना नावाच्या लेखमालिका लिहून महाराष्ट्रात सकारात्मकता पसरवली. त्याने दाखवून दिलं की तो एक उत्तम सामाजिक कार्यकर्ता आहे. त्याच्यावर टिका करणारे सगळे लोक तोंडावर आपटले. या काळात अनेक लोक जयेशसोबत संपर्क साधून आपलं दुःख हलकं करत होते? इतक समाजासाठी कोण करतं हो? इतकंच नाही तर लॉकडाऊनच्या काळात त्याने जवळ जवळ २०० ते ३०० कुटुंबाला धान्य मिळवून दिलं. जे काम सरकारचं होतं ते 
जयेशने केलं... तरीही जयेशवर त्याच्या विरोधकांनी गलिच्छ टिका केलीच. त्या विरोधकांनी समाजासाठी काय केलंय हे मला विचारावसं वाटतंय.
 
त्याचे विरोधक त्याला भक्त किंवा अजून काय काय म्हणून हिणवतात. पण हा एका असंतोषाचा जनक मात्र लोकांसाठी झटतो... त्याचे विरोधक मात्र त्यांच्या घरात बसून उपदेशाचे डोस पाजत असतात. मी जयेशला गेली १० - १५ वर्षे ओळखतोय. त्याची प्रगती मी स्वतः पाहिलेली आहे. त्याचं लग्नही झालं नव्हतं तेव्हापासून त्याला 
ओळखतोय, त्याच्यासोबत काम केलंय. त्यामुळे मला माहितीय तो कलाकार म्हणून बाप आहेच, पण एक माणूस म्हणूनही ग्रेट आहे. आज जवळजवळ सबंध महाराष्ट्रात जयेश मेस्त्री हे नाव पोहोचललेलं आहे. आजही जयेश सरकारच्या चांगल्या-वाईट कारभाराबद्दल लिहितोय. आजच त्याने "माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, मी मुख्यमंत्री होऊ का?" या हेडिंगचा लेख लिहिला. तो लेखही व्हायरल झाला. मला तर हा लेख वाचून नायक चित्रपटातला अनिल कपूर आठवला. त्याने अमरीश पुरीला चॅलेन्ज केलं होतं की मी मुख्यमंत्री बनतो आणि मग अनिल कपुर कसा दुष्टांचा नाश करतो व आपल्या राज्याचा विकास करतो... आज या सरकारची पोलखोल झाल्यासारखं चित्र आहे. अनेक लोक लिहित आहेत पण लक्षात ठेवा मित्रांनो ही ठिणगी जयेशने पेटवली आहे आणि ही ठिणगी पेटवून तो घरात लपला नाही. तर आजही तो आपली लेखणी झिजवतोय....
 
मला प्रामाणिकपणे वाटतंय की उद्या जर हे सरकार कोसळलं तर जयेश मेस्त्रीचाही यात खारीचा वाटा असेल. खरं सांगायचं झालं तर मला राजकारणाविषयी विशेष कळत नाही. मी सामान्य माणूस म्हणूनच माझं मत व्यक्त करत असतो. कंगणा रणौतने मुबईबद्दल जे मत व्यक्त केलं, त्याचा मी निषेधच केला...
 
मी बरोबर आहे अथवा चुकीचा हे मला माहित नाही. पण मी माझ्या मनाचं ऐकतो आणि मला मनापासून वाटतं की जयेश मेस्त्रीला आपण सर्वांनी सहकार्य करायला पाहिजे. त्याच्यासोबत उभं राहायला पाहिजे. तरुण पिढीतला तो एक उभरता नेता आहे. मी त्याला ओळखतो म्हणून सांगतो की त्याच्यात नेतृत्वगुण खूप आहे. लोकांना 
सांभाळणे, त्याचं मन राखणं हे जयेशचे गुण आहे. त्यात तो जमिनीवर काम करणारा कार्यकर्ता आहे. माझ्या मते जयेश शत्रुघ्न मेस्त्री हा महाराष्ट्रातील एका असंतोषाचा जनक आहे... तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? माझ्या मित्राविषयीच्या माझ्या भावना चुकीच्या आहेत का?
 
लेखक: निलेश बामणे
संपादक: साहित्य उपेक्षितांचे