कोणतीही परीक्षा न देता 8 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरी
रेल्वेत नोकरीत करण्यास इच्छुक उमेदवारांसाठी सोनरी संधी चालून आली आहे. डीजल पदांसाठी मॉडर्नाइजेशन वर्क्सने अपरेंटिस ज्यात फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, मॅकेनिक, मशीनिस्ट या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. नोकरीसाठी DMW पटियाला अधिसूचना 2021 जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार या भरतीच्या माहितीसाठी
dmw.indianrailways.gov.in यावर व्हिजिट करु शकतात.
डीजल लोको मॉडर्नाइजेशन वर्क्स पटियालाने DMW पटियाला अधिसूचनेची घोषणा केली आहे. या 182 जागा रिकाम्या आहेत. सर्व अर्ज ऑनलाइन स्वीकार केले जातील. अर्ज 9 मार्च सुरु असून 31 मार्च 2021 पर्यंत आमंत्रित केले जात आहे.
ऑनलाइन रजिस्ट्रेशनची अंतिम तारीख- 31 मार्च 2021
इलेक्ट्रिशियन- 70 पद
मॅकेनिक- 40 पद
मशीनिस्ट- 32 पद
फिटर- 23 पद
वेल्डर- 17 पद
शैक्षिणक योग्यता
उमेदवार इलेक्ट्रिशियन, मॅकेनिक, मशीनिस्ट, फिटर ट्रेडसाठी 50 टक्के गुणांसह 12 वी उर्त्तीण असणे आवश्यक आहे. वेल्डर ट्रेडसाठी 8 वी उत्तीमर्ण असणे आवश्यक आहे.
अर्ज कसे करावे
तेथे आपल्या DMW भरतीसाठी एक सक्रिय लिंक मिळेल.
लिंक आपल्याला एका पेजवर घेऊन जाईल ज्यात अधिकृत अधिसूचना याह अर्ज पत्र देखील असेल.
अधिसूचना लक्ष देऊन वाचा आणि फॉर्म भरल्यानंतर आवश्यक कागदपत्र संलग्न करा.