बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. »
  3. हिंदू
  4. »
  5. सण
Written By राकेश रासकर|

दिवाळी

हिंदू धर्मात सर्वांत महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी. हा सण म्हणजे वाईटाचा नाश, सत्याचा विजय व तिमिरातून तेजाकडे जाण्याचे प्रतीक आहे. हा सण साधारणतः कार्तिक महिन्याच्या अमावस्येला येतो. (इंग्रजी महिन्यानुसार ऑक्टोबर- नोव्हेंबर) दिवाळीला दीपावली असेही म्हणतात.

हा सण साधारणतः पाच दिवसांचे असतो. दिवाळीची सुरवात धनत्रयोदशीने होते. त्यानंतर नरकचतुर्थी, लक्ष्मीपूजन, पाडवा व भाऊबीजेने शेवट होतो. दीपावली म्हणजे दिव्यांची माळ. म्हणूनच याला दिव्यांचा उत्सव (फेस्टीवल आॅफ लाईट) असेही म्हणतात.

दिवाळी साजरी करण्याची वेगवेगळी कारणे आहेत. त्यातले एक म्हणजे भारत शेतीप्रधान देश आहे. दिवाळीच्या काळापर्यंत शेतीचे कामे आटोपलेली असतात. खरीप पीक घरात आल्याने भरपूर अन्नधान्य साठलेले असते.

त्यामुळे या संपन्नतेचे प्रतीक म्हणूनही दीपावली साजरी केली जाते. याशिवाय त्याला पौराणिक कारणेही आहेत. श्रीराम आपला 14 वर्षाचा वनवास भोगून याच काळात आयोध्येत आले, तर कृष्णाने नरकासुराचा वधही याच काळात केला.

दिवाळीच्या एक दिवस आधी वसूबारस साजरी केली जाते. त्या दिवशी गाईची पूजा करून सतत उपयोग ठरणाऱया या प्राण्याच्या प्रती कॉतज्ञता व्यक्त केली जाते. दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी धन म्हणजे संपत्तीची पूजा केली जाते.

सोने खरेदी केले जाते. नरक चतूर्थीला कृष्णाने पहाटे नरकासुराचा वध केला. त्यानंतर तो घरी परतला तेव्हा त्याला आंघोळ घालण्यात आली. तेव्हापासून नरक चतूर्थीला सूर्यादय होण्याअगोदर आंघोळ करण्याची प्रथा पडली. त्याला अभ्यंगस्नान असे म्हणतात.

या दिवशी अंगाला सुगंधी उटणे लावून आंघोळ केली जाते. त्यानंतरच तिसरा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. हा दिवाळीतील सर्वांत महत्वाचा दिवस असतो. या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. चौथ्या दिवशी पाडवा साजरा केला जातो.

या दिवसापासून हिंदू नववर्ष दिनाची सुरूवात होते. पाचव्या व शेवटच्या दिवशी भाऊबीज साजरी कली जाते. या दिवणी यम आपली बहिण यमी हिला भेटायला गेला. त्यावेळी तिने त्याला ओवाळले, अशी पौराणिक कथा त्यामागे आहे.

दिवाळी जवळ आली की घराची साफसफाई केली जाते. रंगरंगोटी, सजावट केली जाते. नवीन कपडे घेतले जातात. मराठी कुटुंबात चिवडा, लाडू, चकल्या, करंजी, शंकरपाळे असे फराळांचे पदार्थ केले जातात. लोक एकमेकांच्या घरी जाऊन मिठाई वाटतात.

शुभेच्छांची देवाणघेवाण करतात. दिवाळीत फटाकेही उडविले जातात. घरासमोर सुंदर सुंदर रांगोळ्या काढल्या जातात. संध्याकाळी पणत्या लावल्या जातात. विद्युत रोषणाईने घर उजळले जाते.

लहान मुले मातीचे किल्ले बांधतात. वर्षभराचे कष्ट विसरून आनंदात हा उत्सव साजरा केला जातो. गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत हा सण तितक्याच उत्साहात साजरा केला जातो.