शुक्रवार, 2 डिसेंबर 2022
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By
Last Updated: मंगळवार, 30 ऑगस्ट 2022 (08:06 IST)

Hartalika Teej 2022 हरतालिकेच्या पूजेची मांडणी कशी करावी जाणून घ्या

hartalika vrat
■ पूजेची जागा झाडून व गोमूत्राने स्वच्छ पूसून घ्यावी., सर्वत्र गोमूत्र शिंपडावे...
 
■ स्वच्छ केलेल्या जागेवर बेलपत्राची रांगोळी काढून त्यावर चौरंग कींवा पाट ठेवावा त्यावर पांढरे सूती/रेशमी वस्त्र अंथरुन मधोमध नदीच्या वाळूची श्री महादेवांची पिंड करावी..,
 
■ त्या पिंडीच्या पूर्वेला एक दूसरी छोटी पिंड (श्री हरितालिका/श्री पार्वती) करावी..
 
■ छोट्या पिंडीच्या समोर दोनही बाजूंना 2 शाळूंका (श्री जया व श्री विजया) कराव्यात..
 
■ श्री महादेवांच्या पिंडीसमोर विड्याच्या जोड पानांवर श्री गणेशांची मूर्ती/सूपारी ठेवावी.,श्री गणपतींसमोर एका छोट्या वाटीत गूळखोबरे ठेवावे...
 
■ श्री गणेशांच्या उजव्या बाजूला घंटी व डाव्या बाजूला शंख ठेवावा.
 
■ मांडलेल्या पूजेसमोर एका छोट्या पाटावर पांढरे कापड अंथरून त्यावर श्री हरितालिका व्रत कथेची पोथी ठेवावी.,पूजेभोवती रांगोळी काढावी...
 
■ अष्टगंध, अक्षता, भस्म, हळदी-कुंकु, पूजनाची फूले, पत्री, दूर्वा, निवडलेले बेलपत्र - 130, धूप, शूध्द तूपाचे निरांजन, खडीसाखर, तांब्याचा तांब्या, ताम्हण, पळी, पेला, विड्याची पाने, खारीक, बदाम, सूपारी, सूटी नाणी, यथाशक्ती दक्षिणा, खण,गळेसरी, बांगड्या इ. साहित्य पूजेच्या ठिकाणी जमवून ठेवावे.