सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By

कोकिलाव्रत: कसे करावे?

ज्या वर्षी आषाढ अधिकमास येईल त्यानंतरच्या शुद्ध आषाढ पौणिमेपासून श्रावण पौर्णिमेपर्यंत कोकिलापूजन, कथा श्रवण, उद्यापन, सौभाग्यवायन देऊन पूर्ण करावे.
स्त्रियांचे आवश्यक व्रत व पुरुषांचे काम्यव्रत आषाढ हा अधिकमास आला असता त्या शुद्ध मासाच्या पौर्णिमेस या व्रताची सुरुवात व श्रावण शुक्ल 15 पौर्णिमेस समाप्ती करतात. कोकिलारुपी गौरी ही या व्रताची प्रधान देवता आहे. नक्त भोजन व पूजा ही याची प्रधान अंगे आहेत. हे संपूर्ण एक महिना करणे शक्य नसेल, तर कमीतकमी सात दिवस, निदान तीन दिवस तरी करावे, असे शास्त्रकार सांगतात.
 
कसे करावे हे व्रत-
पौर्णिमेच्या दिवशी जलाशयावर जाऊन स्नान, सूर्याला अर्घ्य, सायंकाळी आम्रवृक्षाजवळ जाऊन व्रताचा संकल्प, मग षोडशोपचार पूजा नंतर प्रार्थना करून सुवासिनीची संभावना करणे व रानात जाऊन कोकिलास्वर ऐकणे चांगले असते. नंतर घरी येऊन नक्त भोजन करावे.  
 
कोकिलास्वर कानी न पडल्यास त्या रात्री उपोषण व श्रावण पौर्णिमेच्या दिवशी कोकिलारुपी गौरीच्या प्रतिमेचे विसर्जन करावे.
 
तीन वेळा व्रत केल्यावर त्याचे उद्यापन करतात. हविर्द्रव्याचे हवन करतात. सुवासिनींना सौभाग्य द्रव्याचे वायन देतात. ब्राह्मण भोजन घालून व्रताची सांगता करतात. व्रताचे फल अक्षय सौभाग्याची प्राप्ती व पुत्रपौत्र, धनधान्य यांची समृद्धी.