शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

अधिक मासात काय दान करावे?

सर्वांत उत्तम महिना म्हणून अधिक महिन्याची गणना होते. या महिन्यात शुभ कार्ये होत नाहीत, तरीही धार्मिक कर्मकांडांसाठी मात्र हा महिना उत्तम मानला जातो. 

अधिक महिना धार्मिक वा अध्यात्मिक हेतूंच्या प्राप्तीला सहाय्यकारक महिना मानला जातो. संसारचक्रात अडकलेल्या सामान्यजनांना एरवी परमेश्वर व अंतिमत- मोक्ष प्राप्तीसाठी काही करावे याची जाणीव रहातेच असे नाही. परंतु, अधिक महिना हा चार वर्षांत एकदा येत असल्याने या महिन्यात ही जाणीव होऊन काही धर्मकृत्ये करण्याची मनाची तयारी होते.

भारतीय ज्योतिषात अधिक मासाला 'तेरावा महिना' म्हटले आहे. सूर्य बारा राशीत वर्षभर भ्रमण करत असतो. ३२ महिने, १६ दिवस व चार घटकांनंतर सूर्याला कोणतीही संक्रांत नसते. ज्या महिन्यात सूर्याची संक्रांत नसते, तो अधिक महिना मानला जातो.

अधिक महिना असलेले वर्ष ३९६ दिवासांचे असते. इतर वर्षांत ३६५ दिवस ५ तास, ४५ मिनिट व १२ सेकंद असतात.

या महिन्यात दानाचे विशेष महत्त्व आहे. तिथीनुसार दान केल्यास बरेच पुण्य पदरात पडते.

अधिक मासात कोणत्या तिथीला काय दान करावे जाणून घ्या:
कृष्ण पक्ष दान- 
 
प्रतिपदा- चांदीच्या पात्रात तूप 
द्वितीया- कांस्य पात्रात सोने
तृतीया- चणे किंवा चण्याची डाळ
चतुर्थी- खारीक 
पंचमी- गूळ व तुरीची डाळ
षष्ठी- लाल चंदन
सप्तमी- गोड रंग
अष्टमी- कापूर, केवड्याची उदबत्ती
नवमी- केसर
दशमी- कस्तुरी
एकादशी- गोरोचन (गयीच्या पित्ताशयात आढळणारे स्टोन)
द्वादशी- शंख 
त्रयोदशी- घंटीचे दान 
चतुर्दशी- मोती किंवा मोत्याची माळ
पौर्णिमा- हिरा, पन्ना
 
शुक्ल पक्ष दान- 
 
प्रतिपदा- मालपुआ
द्वितीया- खीर
तृतीया- दही
चतुर्थी- सुती वस्त्र
पंचमी- रेशमी वस्त्र
षष्ठी- ऊनी वस्त्र
सप्तमी- तूप 
अष्टमी- तिळ गूळ
नवमी- तांदूळ 
दशमी- गहू
एकादशी- दूध
द्वादशी- कच्ची खिचडी 
त्रयोदशी- साखर व मध
चतुर्दशी- तांब्याचे भांडे
पौर्णिमा- चांदीचे नन्दीगण