गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By

पाण्याबाहेर राहणारा अनोखा मासा

मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है, हात लगाओ तो डर जाएगी, बाहर निकालो तो मर जाएगी.... ही एक सुंदर बाल कविता आहे. थोडक्यात, काय एखाद्या माशाला पाण्याबाहेर काढताच त्याचा मृत्यू होतो, हेच खरे, पण जगात अशा काही माशांच्या प्रजाती आहेत की या प्रजाती मधील मासे पाण्याबाहेरही तासनतास जिवंत राहू शकतात, यावर विश्वास बसत नसला तरी हे खरे आहे.
 
थायलंडला लागून असलेल्या पॅसिफिक महासागरात मडस्किपर प्रजातीचे मासे आढळून येतात. या अनोख्या प्रजातीचे मासे पाण्याबाहेर श्वासोच्छवास करू शकतात. यामुळे ते पाण्याबाहेर येऊन तासनतास बागडतात आणि खेळतातही. मासा कोणत्याही प्रजातीचा असला तरी पाण्याबाहेर कसा काय जिवंत राहू शकतो, असा प्रश्न निर्माण होतो, पण मडस्किपर प्रजातीच्या माशांना निसर्गाकडून मिळालेली ही एक देणगीच आहे.
 
या माशांच्या शरीरात दोन स्पंज पाऊच आहेत. यामुळे पाण्याबाहेर येताना हे मासे या स्पंजमध्ये पाणी भरुन घेतात. या पाण्याच्या मदतीने ते आपले कल्ले ओले ठेवतात. ज्यावेळी या स्पंजमधील पाणी संपते तेव्हा ते सुकून जातात. त्यावेळी हे मासे तोंडाने श्वाशोश्वास करतात. यामुळेच हे मासे अनेक तास पाण्याबाहेर आरामात राहू शकतात.