शुक्रवार, 17 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: बुधवार, 22 डिसेंबर 2021 (15:55 IST)

गणित दिवस : गणित हा विषय समजला त्याला समजला

गणित हा विषय समजला त्याला समजला,
नाहीतर तो पूर्णपणे समजा बोंबलला,
समजला तो तर चटकन डोक्यात शिरतो,
नाहीच पचला, तर तो करायचा कंटाळा येतो,
गणित समजवून सांगणारे पण असावे लागतात चांगले,
नाहीतर गणिता चे गणित होते वांगले,
आयुष्याच ही तसंच आहे, त्याचं ही गणित जमलं तर जमलं,
अन्यथा उलट ते पडलं, तर सोडवता सोडवता सगळं गुंतल!
आकडेवारी करता करताच सगळं संपत,
अर्धवट राहिलंय ते, जे सर्वात पहीले सोडवायच होतं!
.....अश्विनी थत्ते