1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: गुरूवार, 5 ऑगस्ट 2021 (17:30 IST)

सूर्यनमस्कार सुरु करण्यापूर्वी हे मंत्र म्हणावे

हात छातीजवळ नमस्कार स्थितीत असावे. पाय जुळवून समोर पहात किंवा डोळे मिटून बिजमंत्रासहीत सूर्याच्या नावाचा उच्चार करावा.
 
॥ ॐ मित्राय नमः ॥
॥ ॐ रवये नम: ॥
॥ ॐ सूर्याय नम: ॥
॥ ॐ भानवे नम: ॥
॥ ॐ खगाय नम: ॥
॥ ॐ पूष्णे नम: ॥
॥ ॐ हिरण्यगर्भाय नम: ॥
॥ ॐ मरिचये नम: ॥
॥ ॐ आदित्याय नम: ॥
॥ ॐ सवित्रे नम: ॥
॥ ॐ अर्काय नम: ॥
॥ ॐ भास्कराय नम: ॥
 
फायदे
सूर्यनमस्काराच्या अभ्यासाने शारीरिक पातळीवर स्थिरता निर्माण होते. 
संबधित अवयवांवर दाब व ताण येतो ज्याने त्या अवयवांमधील रक्ताभिसरण सुधारतं. 
शुध्द रक्ताचा पुरवठा होतो ज्याने अवयवांचे कार्य वृध्दिंगत होते. अशाने संबधित विकार बरे होण्यास मदत मिळते. 
सूर्य नमस्कार घातल्याने लहान मुलांचे आरोग्य सुधारुन प्रतिकार शक्ती वाढते. 
शारीरिक, मानसिक व भावनिक संतुलन राखणाऱ्या ग्रंथीचे कार्य सुधारते. 
शारीरिक, मानसिक कार्यक्षमता वाढते. 
स्थिरता निर्माण होऊन मुलांमधील चंचलता कमी होण्यास मदत होते. 
लहान मुलांना वारंवार होणारे त्रास जसे सर्दी, ताप, भूक मंदावणे अशा विकारांना दूर ठेवण्यास मदत होते.