9 ग्रहांच्या 9 सुगंधाने आश्चर्यजनक परिणाम मिळवा
आपल्या जीवनात आणि वातावरणात सुगंधाला खूप महत्त्व असते. सुगंध मानसिक शांती प्रदान करते. बऱ्याच रोगांमध्ये सुगंधाने फायदा होऊ शकतो. त्याच प्रमाणे कोणत्याही ग्रहाचा वाईट परिणाम सुगंधाने चांगल्या परिणामात बदलला जाऊ शकतो. तर सुगंधाने ग्रह कसे शांत करता येईल ते जाणून घेऊ या.
1 सूर्य ग्रह : जर तुमच्या कुंडलीत सूर्य ग्रह वाईट परिणाम देत सेल तर आपण केशरी किंवा गुलाबाच्या सुगंधाचा वापर करावा. घराला सुगंधाचा फवारणी करण्याचा स्प्रे आणावा. स्वतःसाठी या पैकी कुठल्याही अत्तराचा वापर करावा.
2 चंद्र ग्रह : चंद्र ग्रह मनाचा द्योतक आहे. या साठी जाई किंवा रातराणीचे अत्तर वापरावे.
3 मंगळ : रक्त चंदनाच्या तेल किंवा अत्तराच्या उपयोगाने मंगळ ग्रहाची शांतता होते.
4 बुध ग्रह : चाफ्याच्या सुगंधाचे अत्तर किंवा तेल वापरल्याने बुध चांगला होतो.
5 गुरु ग्रह : केशर आणि केवड्याच्या अत्तराचा वापर केल्याने तसेच पिवळ्या फुलांचा वापर केल्याने गुरुची कृपा मिळते.
6 शुक्र ग्रह : शुक्र सुधारण्यासाठी पांढऱ्या फुलांचा चंदन आणि कापराचा सुगंध फायदेशीर ठरतो. पण जाई आणि गुलाबाच्या तीव्र वासाने शुक्र बिघडतो. म्हणून त्याचा वापर करणे टाळावे.
7 शनी ग्रह : शनीला सुधारविण्यासाठी आपण कस्तुरी, लोबान आणि बडी शेपेचा सुगंध वापरू शकता.
8 राहू ग्रह : काळ्या गायीचे तूप, आणि कस्तुरीच्या अत्तराचा वापर करून आपण राहू ग्रहाच्या दुष्प्रभाव पासून वाचू शकता. असे करणे शक्य नसल्यास घरातील स्वच्छतेगृहाला स्वच्छ ठेवावे. घरात दररोज कापूर पेटवावे.
9 केतू ग्रह : दररोज घरात कापूर पेटवावे. घराला स्वच्छ ठेवावे. गुल आणि तूप एकत्र करून गवऱ्यांवर टाकून पेटवावे.