गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: सोमवार, 23 मे 2022 (16:43 IST)

Rahu Gochar : 2023 पर्यंत या लोकांवर राहूची कृपा वर्षाव होईल

rahukal
Rahu Gochar : राहु आणि केतुची युक्ती नेहमी उलट असते. ज्या राशींमध्ये यांचा प्रवेश असतो त्या राशीच्या जातकांवर त्याचा अनुकूल परिणाम होत नाही. त्याच्या अनोख्या चालींमुळे ते लोकांच्या जीवनावर विविध सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पाडत राहतात. राहू आणि केतूच्या गोचरचा काही राशींवर अनुकूल परिणाम होईल. धन, कीर्ती, वैभव वाढेल. व्यवसाय आणि नोकरीतही मोठी प्रगती होईल. राहू आणि केतूचा संबंध फक्त सूर्य आणि चंद्राशी आहे. यामुळे ते वेगवेगळ्या राशींवर वेगवेगळे प्रभाव पाडतात.

या राशींवर सकारात्मक प्रभाव पडेल
 
कर्क राशी
कर्क राशीच्या जातकांवर राहुच्या गोचरचा प्रभाव सकारात्मक पडेल. यांना व्यवसायात प्रगती मिळेल. वृद्धीचे लक्षण दिसून येत आहे. नवीन घर आणि नवीन वाहन याचे योग बनत आहे. यावेळी धैर्य आणि संयमाने काम करावे लागेल. अडथळे दूर होऊन एखादे रखडलेले काम पूर्ण होईल. नवीन व्यवसाय देखील सुरु होऊ शकतो.
 
मिथुन राशी
राहु आणि केतुच्या गोचरचा प्रभाव मिथुन राशीच्या जातकांवर देखील पडेल. त्यांना अचानक धन प्राप्ती होऊ शकते. याने मान- सम्मान यात वृद्धी होईल. नोकरीत पदोन्नती होण्याची शक्यता आहे. पद-  प्रतिष्ठा देखील वाढेल. समाजात मान वाढेल. राजकारणात सक्रिय असल्यास यश मिळण्याची शक्यता आहे. आता वाद घालू नये आणि लोकांचा सन्मान करावा.
 
वृषभ राशी
वृषभ राशीच्या जातकांवर राहु- केतुच्या गोचरचा सकारात्मक प्रभाव बघायला मिळेल. ही स्थिती वृषभ राशीच्या जातकांसाठी अनुकूल आहे. यावेळी व्यवसायात यश प्राप्त होईल. लक्ष्मी देवीची विशेष कृपा प्राप्त होईल आणि अपार धन प्राप्ती होईल. त्यांचा आर्थिक फायदा गेल्या अनेक वर्षांपेक्षा जास्त असेल. त्यामुळे त्यांनी आपल्या बोलण्यावर संयम ठेवावा आणि विवेकाने निर्णय घ्यावा.