शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : बुधवार, 9 ऑक्टोबर 2024 (07:55 IST)

बुधवारी इच्छा पूर्ण करण्यासाठी करा गणपतीची पूजा!

ganapati
श्री गणेश हे सगळ्यांचे लाडके दैवत आहे. विशेष म्हणजे ते विघ्नहर्ता आहेत. बुधवार हा वार गणरायाचा वार मानला जातो. त्यामुळे बुधवारी निर्मळ मनाने गणेश आराधना केल्याने मनातील सगळ्या इच्छा आकांक्षा क्षणात पूर्ण होऊन जातात.
 
मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी बुधवारी खाली दिलेले उपाय करा...
 
श्री गणरायाला बुधवारी मालपुआ अर्पण केल्याने विवाहोच्छूक तरुणींचे विवाह जुळतात.
 
कार्य सिद्धिसाठी ब्राह्मण पूजा करून गुळ आणि शुध्द तुप दान केल्याने धन प्राप्ती होते.
 
गुळ आणि दूर्वा नंदीला खाऊ घातल्याने रखडलेली कामे दूर होतात.
 
श्री गणरायाला प्रसन्न करण्यासाठी दूर्वा, मोदक, मिष्ठान्न आदी अर्पण करा. असे केल्याने श्री गणेश मनोकामना पूर्ण करतात.