शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ग्रह-नक्षत्रे
Written By वेबदुनिया|

नवग्रह यंत्राची पूजा करून सर्व अडचणींना मात करा!

WD
सर्व लोकांच्या आयुष्यावर ग्रहांचा विशेष प्रभाव असतो. लोकांनी कितीही खडतर परिश्रम केले तरी त्यांना त्यांच्या कामात यश प्राप्त होत नाही. या कठीण काळात नवग्रह यंत्राची पूजा करा. नवग्रह यंत्राची पूजा केल्याने सर्व ग्रहांची एकाच वेळेस आपल्याला पूजा करण्याचे पुण्य मिळते.

नवग्रह यंत्राला समोर ठेऊन त्याची उपासना केल्यास सर्व प्रकारचे भय नष्ट होते. शाररीक स्वास्थ्य उत्तम राहते. व्यापारात फायदा होतो, समाजात मान-सन्मान प्राप्त होतो.

उपयोग

- सूर्य ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी या यंत्रासोबत विष्णू देवाची पूजा करा.

- चंद्र ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी या यंत्रासोबत महादेवाचे पूजन करा.

- मंगळ ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी या यंत्रासमोर हनुमानाची पूजा करा.

- बुध ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी या यंत्रासोबत दुर्गा देवीचे पूजन करा तसेच दुर्गा सप्तशतीचे पाठ करा.

- बृहस्पति (गुरु) ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ब्रम्हदेवाची पूजा करा.

- शुक्र ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मीची पूजा करा.

- शनी किंवा राहू ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी भैरवजीची पूजा करा.

- केतू ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी या यंत्रासोबत गणपतीची पूजा करा.