रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. करिअर
  4. »
  5. गुरूमंत्र
Written By संदीप पारोळेकर|

करीयरसाठी प्लॉनिंग आवश्यक!

WD
WD
इयत्ता दहावी ही करीयरची पहिली पायरी समजली जाते. दहावीचं वर्ष जसं महत्त्वाचं असतं तसंच धोक्याचंही असतं. हे आपल्याला ठाऊक असेलच. या वयात मुलांना पंख फुटतात, असे त्यांचे पालक म्हणतात. या वयात अर्थात सोळाव्या वयात मुलांची पालक त्यांची जरा जास्तच काळजी घेत असतात. अशा मुले विषय निवडण्यात डगमजतात. करीयरचं प्लॉनिंग करू शकत नाहीत.

बाबांनी सांग‍ितलं म्हणून मी अमक्या विषयाची निवड केली, माझ्या मित्रांने टमक्या विषयात प्रवेश घेतला म्हणून, मी ही इकडे वळलो, अशी उत्तरे विद्यार्थ्यांमधून येतात. मात्र करीयरसाठी प्लॉनिंग हे आपण स्वत:च केलं पाहिजे हे विद्यार्थी विसरतात अथवा तेव्हा त्यांना या गोष्टीचं फारसं ज्ञानही नसतं. पालकांनी आधी आपल्या पाल्याची इच्छा जाणून घेणे गरजेचे असते. मात्र, पालक हे आपल्या पाल्याचे काहीच ऐकूण न घेता. त्यांची इच्छा नसताना, नावडत्या विषयाला प्रवेश घेवून देतात व सगळं गणित चुकतं.

प्रत्येकाने करियर प्लॉनिंग करणं हे गजरेचं आहे. प्रत्येकाने स्वत:ची परीक्षा घेतली पाहिजे व आपण पास की नापास हे ठरवून स्वत:ची अभ‍िरूची व क्षमता ओळखली पाहिजे. त्यानुसारच करीयर क्षेत्र निवडले पाहिजे. विषयाची आवड आणि भविष्यातील संधी ओळखून त्या संदर्भा‍त योग्य माहिती स्वत:च घेतली पाहिजे.

काही विद्यार्थी लाजाळू, परंपरावादी, दुसर्‍यांवर चटकन प्रभावीत होणारे असतात. त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमताही फारशी नसते. अशा विद्यार्थ्यांना करीयरची दिशा ठरविण्यात अडचणी येतात. असे विद्यार्थी पालक अथवा करीयर गाईडकडून मार्गदर्शन घेऊन करीयरची दिशा निश्चित करून त्या दिशेन यशस्वी वाटचाल करू शकतात.