शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. गुरूमंत्र
Written By
Last Modified: गुरूवार, 11 मार्च 2021 (20:38 IST)

स्मरणशक्ती वाढविण्यासाठी हे 5 उपाय करा

सर्वप्रथम हे लक्षात घ्या की ज्या गोष्टींना लक्षात ठेवायचे आहे त्यांना समजून घेणं महत्त्वाचे आहे. काही लोक घोकमपट्टी करून लक्षात ठेवतात. परंतु हे काही काळच लक्षात राहते. कालांतरानंतर त्या गोष्टी विसरायला होतात. आपण विध्यार्थी असल्यास बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात.  गोष्टींना लक्षात ठेण्यासाठी स्मरण शक्ती वाढविण्यासाठी हे 5 उपाय अवलंबवा. 
 
1 समजून घ्या - आपण वर्गात शिकत असाल तर आपल्याला जे काही विषय शिकवतात, त्या विषयात चांगले लक्ष देण्यासाठी त्यांच्या वर लक्ष देऊन त्यांना समजून घेण्याची गरज आहे. समजून घेतल्याने ते चांगल्या प्रकारे लक्षात राहतात. म्हणून नेहमी गोष्टी समजून घेण्यावर लक्ष केंद्रित करा. 
 
2 स्मरण शक्ती वाढविण्यासाठी मन एकाग्र करा-
स्मरण शक्ती वाढविण्यासाठी सर्वप्रथम त्या गोष्टीमध्ये मन लावा. एखाद्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी त्या विषयामध्ये मन एकाग्र करणे आवश्यक आहे.सध्या मुलं अभ्यासासह संगीत ऐकतात. अशा परिस्थिती मन कसे एकाग्र होणार. आणि आपल्याला काहीच लक्षात राहणार नाही.म्हणून नेहमी अभ्यास करताना लक्ष अभ्यासाकडे असावे. संगीत ऐकण्यावर नाही.  
 
3 वर्तमान गोष्टींकडे लक्ष द्या- 
स्मरण शक्ती वाढविण्यासाठी वर्तमानावर लक्ष केंद्रित करा. आपण वर्गात बसला आहात आणि शिक्षक शिकवणी घेत आहे. आपले लक्ष बाहेर किंवा भूतकाळातील एखाद्या गोष्टीवर केंद्रित झाले असल्यास आपल्याला शिकवलेले लक्षात राहणार नाही. स्मरण शक्ती वाढविण्यासाठी नेहमी वर्तमानात जगणे शिका. असं केल्याने शिकवलेला अभ्यास लक्षात राहील आणि विषय अवघड वाटणार नाही.  
 
4 लक्षात ठेवण्याची क्षमता वाढवा- 
आपले मेंदू असीम गोष्टींना लक्षात ठेवते. गरज आहे त्यांना योग्यरीत्या वापरण्याची. आपल्याला स्मरणशक्ती वाढवायची आहे तर त्या गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रित करावे लागेल. आपण गणिताचे विद्यार्थी असाल तर फार्मुले लिहून ठेवा आणि लक्षात ठेवा. असं केल्याने आपल्याला ते फार्मुले पाठ होतील आणि आपण त्यांना न बघता देखील लिहू शकाल. असं का होतें. जेव्हा आपण लिहून ठेवता तेव्हा आपण आपल्या लक्षात ठेवण्याची क्षमता वाढवता आणि मेंदूने देखील सहकार्य केले या मुळे आपल्याला फार्मुले पाठ झाले. 
 
5 सतत लक्षात ठेवण्याचा सराव करा- 
एखादी गोष्ट कायमची लक्षात ठेवण्यासाठी सतत त्या गोष्टीची उजळणी केली पाहिजे. आपल्याला असे वाटत आहे की आपण त्या विषयाला विसरत आहोत तर पुन्हा त्याची पुनरावृत्ती करावी . असं केल्याने ते लक्षात राहील.