शनिवार, 16 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य लेख
Written By संदीप पारोळेकर|

'पार्टनर'ला समजून घ्या!

ND
ND
'पार्टनर' या शब्दाचा अर्थ मित्र, सवंगडी, सखा अथवा बिझीनेस पार्टनर असा वापरला जात असला तरी येथे 'पार्टनर' या शब्दाचा अर्थ 'बेड पार्टनर' अर्थात आपली पत्‍नी, बायको, अर्धांगनी असा घ्यायचा आहे.

वैवाहीक जीवनात 'प्रणयानंद' न घेऊ शकणार्‍यांची यादी फारच मोठी आहे. आयुष्य पार मावळतीला येऊन जातं तरी काही जोडप्यांमधील कलह शांत झालेले नसतात. प्रणयक्रीडेत 'पार्टनर'कडून पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्याने अनेक लोक आपल्या पार्टनर विषयी 'कंफ्यूज' असतात. प्रत्येक रात्रीचा त्यांच्या आनंद, उत्साह व उत्तेजनांवर विरजण पडत असते. 'पार्टनर'कडून प्रतिसाद न मिळण्याची अनेक कारणे असू शकतात. ती त्याला विश्वासात घेऊन जाणून घेण्याची आवश्यकता असते.

स्त्रिया 'मुडी' असतात, असे अनेक पुरुषांचे मत असते. ह्याच 'मुडी' पणाचा परिणाम त्याच्या 'सेक्स ड्राइव' वरही होत असतो, असे ते मानतात. काही महिला तर आपल्या नवर्‍याच्या बाहुपाशात येण्यास नकार देतात. मग चुंबन तर दूरच. यामुळे पुरुषांमध्ये आपल्या 'पार्टनर'विषयी चुकीचा ग्रह निर्माण होण्यास वेळ लागत नाही. महिलांच्या अशा वागण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यासाठी ती जाणून घेऊन आपल्या आनंदात येणार्‍या अडचणी दूर केल्या पाहिजेत.

मन न लागणे-
'Haypoctive Sexual Desire Disorder' च्या केसेसमध्ये अशा प्रकारच्या महिलांचे प्रमाण अधिक असते, असे यूनिवर्सिटी ऑफ शिकागो येथे 18 ते 59 वयोगटातील महिलांवर करण्यात आलेल्या अभ्यासात दिसून आले आहे. शारीरिक व मानसिक अस्वस्थतेने ग्रासलेल्या महिलांमध्ये सेक्स करण्याविषयी रस निर्माण होत नाही. प्राथमिक स्टेजमध्ये महिलांमध्ये सेक्सची इच्छा जागृत होत नाही. दुसर्‍या टप्प्यात महिलांमधील सेक्सचे हार्मोन्स लोप पावतात. आपल्या 'पार्टनर'विषयी त्याच्या मनात भीती निर्माण होऊन त्या सेक्स करण्यापासून दूर रहातात. या महिलांमध्ये वैफल्य निर्माण होते. मग प्रेमाची जागा भांडणं, कलह व एकटेपणा घेतो. अशा परिस्थितीत महिलांना प्रेमाने हाताळले पाहिजे. त्यांच्या मनातील भीती नाहीशी करून त्यांना मन मोकळं करण्याची संधी द्यावी. पुरुषांनी अशा परिस्थितीत जोर जबरदस्ती करू नये.
आपल्या समाजात 'सेक्स'विषयी एखाद्या महिलेने खुलेपणाने बोलले, ती महिला चांगल्या वर्तवणुकीची नाही, असे म्हटले जाते. त्यामुळे आपण कितीही पुढारले असलो तरी 'सेक्स' संदर्भात भारतीय महिलांमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न, द्विधा आहेत. लग्न होऊन ही आपल्या पतीशी....


थकवा जाणवणे-
महिलांनी 'चूल आणि मूल' ही चौकट केव्हाच ओलंडलीय. जॉब करत असताना महिलांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असते. त्यामुळे त्यांना मानसिक व शारीरिक थकवा येत असतो. या सगळ्या गोष्टीचा परिणाम त्यांच्या सेक्स लाइफवर होत असतो. तणावात वावरत असणार्‍या महिला सेक्समध्ये जास्त रूची घेत नाहीत. याशिवाय सेक्सबाबत नाराज होणे, प्रेग्नंसीची भीती व त्यापासून होणार्‍या त्रासापासून त्या नेहमी दूर पळताना दिसतात.

अशा स्थितीत आपल्या पार्टनरला हळूच बाहुपाशात घेऊन तिच्या मनातील भीती काढावी. आपण तिच्यासाठी काय स्पेशल करू शकतो, याचा विचार केला पाहिजे. पार्टनरमध्ये सेक्स भावना जागृत करण्यासाठी सेक्स मसाजचा वापर करू शकता.

न्यूनगंड (कमीपणा)-
सेक्स करण्याआधी महिलांना त्याविषयी भीती तर वाटते. त्यापेक्षा त्यांच्यात न्यूनगंडाची भावना निर्माण होते. काही महिलांना आपल्या 'पार्टनर'समोर लाइट चालू असताना कपडे उतरवण्यात लज्जा, कमी‍पणा वाटत असतो. सेक्स झाल्यानंतर लगेच काही महिलांना कपडे घालायची घाई होते. टीव्हीवर अशा प्रकारच्या घटना पाहून त्याच्या मनात एक प्रकारचा न्यूनगंड तयार झालेला असतो. तसेच सेक्स करत असताना आपल्या जोडीदाराकडून मिळणारी हीन वागणूक त्यांच्या मनात सेक्सविषयी गैरसमज निर्माण करत असतात.

अशावेळी आपल्या पार्टनरसोबत जास्तीत जास्त काळ घालविला पाहिजे. पार्टनरचे मन जिंकणे, ही प्रणयक्रीडेतील पहिली पायरी आहे. त्यासाठी पार्टनरमध्ये प्रत्येक गोष्टी पारदर्शकता असणे आवश्यक असते. आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीचा परिणाम आपल्या सेक्स लाईफवर पडत असतो.

आहार-
'सेक्स ड्राइव्ह' वाढविण्यासाठी आपल्या आहाराकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. 25 वर्षांच्या एका तरूणीने लग्नाआधी वजन कमी‍ करण्यासाठी खूप डाएटिंग केले. लग्नापर्यंत ती अतिशय स्लिम होऊन गेली. मात्र लग्न झाल्यानंतर सेक्समध्ये तिची रुची कमी झाल्याचे निदर्शनात आले. नियमित आहारामुळे आपला सेक्स स्टॅमिना वाढत असतो. चॉकलेट हे 'मूड लिफ्टर्स'चे कार्य करत असतात. त्यामुळे पार्टनरला चॉकलेट खाण्यास द्यावीत. बटाट्याचे चिप्स ऐवजी काकडीचा सलाद फायदेशीर ठरतो.

औषधांवर लक्ष ठेवा-
भीती, तणाव व डिप्रेशन दूर करण्यासाठी महिला काही औषधांचे सेवन करत असतात. त्यामुळे सेक्समधील त्यांची रुची‍ कमी होत असते. पाळणा लांबविणार्‍या गोळ्यांचा ही सेक्स जीवनावर विपरित परिणाम होत असतो. अशा प्रकारची औषधे आपल्या पार्टनरला घेऊ देऊ नये. त्यांना योग्य डॉक्टरच्या मार्गदर्शनाची गरज आहे, हे ओळखावे.

ND
ND
आपल्या समाजात 'सेक्स'विषयी एखाद्या महिलेने खुलेपणाने बोलले, ती महिला चांगल्या वर्तवणुकीची नाही, असे म्हटले जाते. त्यामुळे आपण कितीही पुढारले असलो तरी 'सेक्स' संदर्भात भारतीय महिलांमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न, द्विधा आहेत. लग्न होऊन ही आपल्या पतीशी 'सेक्स'संदर्भात महिला बोलू पावत नाही. आपल्या 'पार्टनर'ला सेक्सचे किती ज्ञान आहे, हे सेक्स करण्‍यापूर्वी जाणून घेऊन त्याच्या मनातील त्याविषयी असलेली भीती, गैरसमज दूर केले पाहिजेत. आपल्या 'पार्टनर'शी जोर जबरदस्ती न करता प्रेमाने जमवून घेतले तर आपल्या सेक्स लाइफमध्ये कधीच वादळ येणार नाही व तुम्हाला व तुमच्या पार्टनर सेक्सचा खर्‍या अर्थाने आनंद घेता येईल.