रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

ध्यानामुळे हृदयरोग दूर होण्यास मदत

ध्यानधारणा करणे आरोग्यदायी जीवनशैलीसाठी फायदेशीर असून हृदयविकार दूर करण्यासाठी ध्यान करणे अतिशय लाभदायक ठरत असल्याचे अमेरिकेतील तज्ज्ञांनी म्हटले आहे.
 
ध्यान करण्यामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर चांगला परिणाम होतो तसेच यासह शरीराला ध्यान करण्याचे अनेक फायदे होत असल्याचे मागील अभ्यासांमध्ये दिसून आले आहे. अमेरिकन हर्ट असोसिएशनच्या संशोधकांनी हृद्यासंबंधित आजार दूर होण्यास ध्यान करणे कसे फायदेशीर आहे याबाबत अभ्यास केला. ध्यान करण्याची परंपरा मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे.
 
शरीरामध्ये आलेला ताण-तणाव दूर करण्यासाठी ध्यान अतिशय फायदेशीर आहे. ध्यान करण्यामुळे आपल्या शरीरामध्ये अतिशय सकारात्मक बदल घडून येत असल्याचे यापूर्वीच्या अभ्यासात दिसून आले आहे. बसून करण्याच्या ध्यानामुळे लक्षवेधी ध्यानासाह अनेक ध्यानांचा संशोधकांनी अभ्यास केला.
 
ध्यानामुळे ताण, चिंता आणि उदासीनता दूर होण्यास मदत होते. तसेच झोपेमध्ये सुधारणा होऊन शरीरामध्ये अतिशय सकारात्मक बदल होण्यास सुरूवात होत असल्याचे संशोधकांना आढळून आले. ध्यान करण्यामुळे उच्च रक्तदाब कमी होतो. तसेच यामुळे धूम्रपान सोडण्यास आणि हृदयविकाराचा झटका टाळण्यास मदत होत असल्याचे संशोधकांनी सांगितले.