सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Updated : शनिवार, 1 जुलै 2023 (10:06 IST)

National Doctors Day 2023 : डॉक्टर्स डे का साजरा करतो? जाणून घेऊ या पूर्ण माहिती

आपल्या समाजासाठी आणि आपल्या निरोगी आरोग्यासाठी डॉक्टर खूप महत्त्वाचे आहेत. प्रत्येकालाच कधी ना कधी डॉक्टरांकडे जावेच लागते. सामान्यतः लोक आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी डॉक्टरांकडे जातात. लोकांच्या आरोग्याच्या संबंधित सर्व समस्यांचे इलाज उपलब्ध असतात. म्हणूनच आपण डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत 1 जुलैला ‘राष्ट्रीय डॉक्टर दिन’ साजरा केला जातो..

1 जुलैला आपण डॉक्टर्स डे का साजरा करतो?
बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय (Dr. Bidhan Chandra Roy) रॉय यांच्या स्मरणार्थ 1 जुलै 1991 रोजी भारतात प्रथमच 'राष्ट्रीय डॉक्टर दिन' साजरा करण्यात आला. मानवतेच्या सेवेत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. डॉ. रॉय हे उत्तम डॉक्टर होते. शिक्षक असण्यासोबतच ते सक्रिय सामाजिक कार्यकर्तेही होते. त्यांनी 14 वर्ष पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणूनही काम केले. डॉ. रॉय यांचा जन्म 1 जुलै 1882 रोजी झाला. त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने  म्हणजेच 1 जुलै रोजी 'राष्ट्रीय डॉक्टर्स दिन' साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. योगायोगाने त्यांचेही 1 जुलै (1962) रोजी निधन झाले. या दृष्टीने त्यांना श्रद्धांजली म्हणून काही लोक राष्ट्रीय डॉक्टर दिनही साजरा करतात. डॉ बी सी रॉय यांना 4 फेब्रुवारी 1961 रोजी भारतरत्नही देण्यात आला होता.
 
तुम्ही कसे साजरे करता?
डॉक्टर्स डे वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जात असला तरी तो साजरा करण्याची पद्धत कमी-अधिक प्रमाणात सारखीच आहे. या दिवशी डॉक्टरांना ग्रीटिंग कार्ड देऊन सन्मानित केले जाते. या दिवशी, डॉक्टर त्यांच्या रूग्ण आणि त्यांच्या जवळच्या आणि प्रियजनांसोबत एखाद्या विशिष्ट आजाराच्या विषयावर सेमिनार आयोजित करतात आणि त्यांना विशिष्ट रोगाबद्दल तपशीलवार सांगतात.
 
डॉक्टर दिनाचे महत्व
कोविड-19 नंतर डॉक्टरांचे महत्त्व शब्दात मांडता येणार नाही. मरणासन्न रुग्णाला नवजीवन देणाऱ्या डॉक्टरांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. कोविड काळात डॉक्टर आणि त्यांचे सहकारी 10 ते 15 दिवस सतत रूग्णालयात राहून जीव धोक्यात घालून रूग्णांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या जीवाची पर्वा न करता, जगातील डॉक्टरांनी ज्या भावनेने आणि समर्पणाने रुग्णांची सेवा केली, त्यांना देवाच्या बरोबरीने ठेवून त्यांचा आदर करणे कदाचित पूर्ण होणार नाही.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor