1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified शनिवार, 7 ऑगस्ट 2021 (00:03 IST)

वजन कमी करण्यासाठी लिहा फूड डायरी

लवकर वजन कमी करायचे असेल तर डाएटिंग करण्याऐवजी फूड डायरी लिहा, असा सल्ला अमेरिकी संशोधकांनी लठ्ठमंडळींना दिला आहे. आपल्या खानपानाच्या सवयी दररोज नोंदवून ठेवल्याने लठ्ठपणाच्या समस्येवर नियंत्रण ठेवता येणे शक्य असल्याचे त्यांची म्हणणे आहे. 
 
अमेरिकेच्या अकादमी ऑफ न्युट्रीशिएन्स अँड डायेटिक्सच्या नियतकालिकेत हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. आपण आहारामध्ये दररोज ‍किती कॅलरी घेतो याचा योग्य हिशोब ठेवता आला तर वजन कमी करणे सहज शक्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यासाठी संशोधकांनी पन्नास ते पंच्याहत्तर या वयोगटातील 123 लठ्ठ महिलांचा अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष काढला आहे. 
 
डाएटिंग न करणार्‍या पण आहारातील कॅलरीजचा हिशोब ठेवणार्‍या महिला लवकर सडपातळ झाल्याचे दिसून आले. वजन कमी करण्यासाठी कमी भोजन घेणार्‍या व्यक्तींच्या शरीरावर कालांतराने विपरीत परिणाम होत असल्याचे दिसनू आले आहे.