शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

'ग्रीन टी' चे साइड इफेक्ट्स

ग्रीन टी पिण्याचे फायदे तर आपण खूप ऐकले असतील. हेच की ग्रीन टी पिण्याने वजन कमी होतं, त्वचा ताजीतवानी दिसते, केस गळणे थांबतात आणि याने शरीर फिल्टर होतं. पण काय आपल्या हे माहीत आहे का ग्रीन टी चे अती सेवन केल्याने आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतात. जाणून घ्या कसे? 
ग्रीन टी बद्धकोष्ठता, अतिसार, उलट्या होणे, चक्कर येणे आणि डोकेदुखीसाठी ही कारणीभूत ठरू शकते. यात कॅफीन असतं ज्याने झोप न येण्याच्या समस्याला सामोरा जावं लागू शकतं. म्हणून आपण ग्रीन टी पिऊन लठ्ठपणा कमी करू इच्छित असाल तर हे खालील दिलेले चरण पाळा आणि योग्यरीत्या ग्रीन टी आपल्या दैनिक जीवनात सामील करा.
 
पुढे वाचा केव्हा आणि कसे सेवन करायचे?

फ्रेश ग्रीन टी
फ्रेश ग्रीन टी शरीरासाठी आरोग्यदायी आहे. आपण आपल्या आवडीप्रमाणे गरम किंवा गार टी पिऊ शकता, केवळ तो चहा एका तासाहून आधी तयार केलला नसावा. अती उकळलेला चहा कँसरला आमंत्रण देतो म्हणून अती गरम चहा पिऊ नये. जर आपण चहा अधिक वेळापर्यंत स्टोअर करून ठेवाल तर त्यातून विटामिन आणि अँटी-ऑक्‍सीडेंट नाहीसे होतील. याव्यतिरिक्त यात आढळणारे जीवाणूरोधी गुणधर्मही कमी होतात. खरं म्हणजे अधिक तास ठेवलेल्या चहात जीवाणू पसरू लागतात. म्हणून नेहमी फ्रेश ग्रीन टी चे सेवन करा. 
जेवण्याचा एका तासाआधी प्या
जेवण्याच्या एका तासापूर्वी ग्रीन टी सेवन केल्याने वजन कमी होतं. याने भुकेवर नियंत्रण राहतं ज्याने ओव्हरइटिंग करण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. ग्रीन टी सकाळी रिकाम्यापोटी घेणे टाळावे.
 

औषधांबरोबर घेणे टाळा
कधीही औषध ग्रीन टी बरोबर घेऊ नये. औषध नेहमी पाण्याबरोबर घ्यायला हवे. 
 
जास्त स्ट्रॉंग नको
ग्रीन टीमध्ये कॅफीन आणि पॉलीफिनॉल ची मात्रा अधिक असते. याने शरीरावर वाईट परिणाम होतो. कडक आणि कडू ग्रीन टी पिण्याने पोट गडबडत, अनिद्रा आणि चक्कर येण्या सारख्या तक्रारी होतात. 
केवळ 2-3 कप
आधी ही उल्लेख केले आहे की अती चहा नुकसानदायक आहे. या हिशोबाने दररोज 2-3 कपाहून अती ग्रीन टी पिण्याने नुकसान होईल.