मुलांना चहा पाजणे योग्य आहे का?
अनेक भारतीय कुटुंबांमध्ये छोट्या मुलांना चहा प्यायला दिला जातो. अनेक लोकांप्रमाणे चहाने पचन क्रिया सुरळीत राहते, हवामान बदलल्यावर होणारे रोग दूर होतात आणि रोग प्रतिकारशक्ती वाढते. चहाचे हे फायदे तर आहे पण आपला हा निर्णय की छोट्यांना मोठ्यांप्रमाणेच चहा दिला पाहिजे हा चुकीचा आहे. चहात अधिक दूध मिसळून देणे किंवा बिस्किटासोबत चहा पाजण्याने त्याचे हानिकारक प्रभाव कमी होत नाही. तज्ज्ञांप्रमाणे चहा हा पेय लहान मुलांसाठी हानिकारक आहे.
चहा मोठ्यांसाठी योग्य आहे पण नवजात किंवा त्याहून थोड्या मोठ्या वयाच्या मुलांने चहाचे सेवन केल्याने कॅल्शियमच्या शोषणावर वाईट प्रभाव पडतो ज्याने कॅल्शियमसंबंधी रोग होऊ शकतात. नियमित चहाचे सेवन केल्याने थोड्या मोठ्या वयाच्या मुलांच्या मेंदू, स्नायू, मज्जासंस्थांवर प्रभाव पडतो आणि त्यांची संरचनात्मक वाढ थांबते.
लहान वयात चहा पिण्याचे काही सामान्य दुष्परिणाम म्हणजे हाडं कमजोर होणे, शारीरिक वेदना, एकाग्रतेचा अभाव, चिडचिड आणि इतर विकार.
काही लोकं विचार करतात की चहात अधिक दूध मिसळून मुलांना पाजण्याने वाईट परिणाम होत नाही आणि कॅल्शियमची कमी दूर होते. पण हे खूप कमी लोकांना माहीत असेल की दूध चहात मिसळल्यावर दुधाची गुणवत्ता नष्ट होते. दुधात आढळणारे कॅसीन आणि प्रोटीन चहाच्या कॅटेचिंसमध्ये मिसळतात. हे मिश्रण नर्वस सिस्टमवर अफू चा प्रभाव टाकतात ज्याने चहा पिण्याची सवय लागते आणि लहान असो या मोठ्या वयात कोणत्याही गोष्टींची व्यसनरूपी सवय लागणे आरोग्यासाठी योग्य नाही.