रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला
Written By संदीप पारोळेकर|

प्रणयक्रीडेचे काही नियम

NDND

* दिवसा समागम करू नये. समागम (मैथुन) नेहमी रात्री केले पाहिजे आणि ते ही केवळ एकदाच.

* सूर्योदयाआधी व सूर्योदयानंतर काही ब्रम्ह मुहूर्त असतो. या काळात केलेले समागम आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असतो.

* झोपण्याआधी दूध घेऊ नका, जर दूध घ्याचेच झाले तर झोपण्‍याच्या एक तास अगोदर घ्या.

* आपल्या पत्‍नीच्या मासिक धर्माच्या काळात तिच्यासोबत समागम टाळावा. निरोधचा (कंडोम) उपयोग करून ही समागम करू नका. मासिक धर्माच्या काळात केलेल्या समागमामुळे अनेक रोगाना सामोरे जावे लागण्याची वेळ येऊ शकते. अनैसर्गिक मैथुनाला बळी पडू नका. या काळात संयम हाच एकमेव उपाय आहे.
NDND

* काही नागरिक समागमाकडे औपचारिकता दृष्टीने पहात असतात. केवळ वीर्य स्खलन झाले म्हणजे प्रणयक्रिडा थांबवून टाकतात. घाईत केलेल्या समागमाने आपले ही समाधान होत नाही तसेच आपला जोडीदाराही संतुष्ट होणार नाही. समागमाच्या आधी पुरेसा प्रणय करणं गरजेचे असते. मात्र हे अनेक जोडप्याना माहितच नसते. समागमापूर्वी प्रणय केल्यामुळे दोघांमध्ये सुखद संवेदना जागृत होऊन पुरुषाचे शिश्न ताठर व स्त्रीच्या योनीमध्ये ओलावा निर्माण होतो. दोघांमध्ये समाधानकारक समागम होण्यासाठी या गोष्टी फारच महत्त्वाच्या असतात. समागमा अगोदर साधारण 15 ते 20 मिनिटे प्रणय करावा.

* समागम कधीच एकतर्फी होऊ शकत नाही. त्यासाठी पती- पत्‍नीमध्ये समन्वय असायला पाहिजे. जर आपला जोडीदार थकला असेल किंवा त्याच्या मनात भिती निर्माण झाली असेल तर त्याच्यावर कुठल्याच प्रकारची जोरजबरजस्ती करणे योग्य नाही. दोघेही एकरूप झाल्याशिवाय समागमाचे समाधान होत नाही.

* समागमात आसनाचे खूप महत्व आहे. परंतु आसनांचे परिपूर्ण ज्ञान असणे आवश्यक असते.
NDND


* समागम झाल्या झाल्या ढसाढसा पाणी पिऊ नये. समागम झाल्यानंतर पती- पत्‍नीने मिष्ठान्न खाल्ले पाहिजे. व त्यानंतर साधारण अर्ध्या तासानंतर पाणी ग्रहण करणे, दोघांच्या आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असते.

* संभोगानंतर लिंग थंड पाण्याने न धुता त्याला स्वच्छ कापडाने पुसले पाहिजे.

* संभोग झाल्यानंतर लगेच हवेत फिरायला निघणे दोघांच्या दृष्टीने हानिकारक होत असते.

* आपल्या वयापेक्षा अति मोठ्या किंवा अत‍ि लहान व्यक्तीशी संभोग करू नये. तसेच एका पेक्षा जास्त व्यक्तिशी संभोग करणे, आपल्या संस्कृतीच्या विरूध्द आहे.

* समागम करण्‍यापूर्वी काही नागरिकामध्ये न्यूनगंड निर्माण होत असतो. त्यामुळे बाजारात आलेल्या शक्तिवर्धक औषधीचे ते सेवन करत असतात. अशा औषधीचे अतिसेवन केल्याने आपली नैसर्गिक शक्ति लोप पावत असते. न्यूनगंड निर्माण झाल्यास डॉक्टराचा सल्ला घ्या.

अशा काही नियमाचे पालन केल्याने आपण आपल्या जोडीदारासोबत समागमाचा परमोच्च आनंद घेऊन आपल्या क्षमतेत वृध्दी करू शकता.