1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला
Written By वेबदुनिया|

प्रवासात काय काळजी घ्याल?

प्रवासाला निघण्यापूर्वी सुकामेवा, बिस्किट्‌स, फरसाण, चिप्स आदी पदार्थ सोबत घ्यावेत. परंतु, त्यांचे अतिसेवन तब्बेत बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकते.

बहुतेकदा रात्रीचा प्रवास करावा लागत असलेल्या नागरिकांनी शक्यतो रेल्वेत अथवा बसमध्ये बसण्यापूर्वी जेवण करू नये. सोबत पाचक आवळा सोबत ठेवावा. रिकाम्या पोटी प्रवास करणे हे आरोग्यासाठी उत्तम. कारण पोट रिकामे असल्याने आपल्याला उलटी अथवा जुलाबाची समस्या उद्भवत नाही.

काहींना बस 'लागते', म्हणजे प्रवासात उलट्या होतात. अशांनी घरून निघण्यापूर्वी जेवण करू नये. त्यांनी शक्यतो रेल्वेने प्रवास करावा. आपला प्रवास एक दिवसाचा असल्यास घरचे जेवण घ्यावे. त्यात सुकामेवा किंवा सिलबंद डब्यात सुकी भाजी घ्यावी त्यातही ओले स्निग्ध पदार्थ, गोड पदार्थ घेऊ नयेत.
  बहुतेकदा रात्रीचा प्रवास करावा लागत असलेल्या नागरिकांनी शक्यतो रेल्वेत अथवा बसमध्ये बसण्यापूर्वी जेवण करू नये. सोबत पाचक आवळा सोबत ठेवावा. रिकाम्या पोटी प्रवास करणे हे आरोग्यासाठी उत्तमत्यामुळे आपल्याला उलटी अथवा जुलाबाची समस्या उद्भवत नाहीत.      

प्रवास करताना पाणी कमी घ्यावे. कारण रेल्वेत त्याची व्यवस्था असते. मात्र, बस किंवा लक्झरीमध्ये तशी व्यवस्था नसल्याने आपण स्वत:ला तसेच इतर प्रवाशाना अडचणीत टाकत असतो. प्रवासात त्रास होत असलेल्यांनी शक्यतो मागच्या बाजूस बसावे. कारण उलटी होत असल्यास मागच्या खिडकीचा वापर करता येतो. काही प्रवाशी उलटी दाबण्यासाठी औषधी गोळ्या घेतात. परंतु, त्या हानीकारक असतात. अशा वेळी कॅरी बॅग तसेच आवळाकंठी‍, आल्याचे तुकडे सोबत ठेवले पाहिजेत.

उलटी किंवा जुलाब ह्या उत्सर्जनात्मक गोष्टी आहेत. त्यांचा दाबून न ठेवता शरीराबाहेर टाकणेच योग्य असते. त्यामुळे शक्यतो प्रवासात त्रास होत असलेल्या प्रवाशांनी काळजी घेतली पाहिजे.