रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 5 नोव्हेंबर 2022 (08:35 IST)

डबल चिन यापासून मुक्त होण्यासाठी हे 2 व्यायाम उत्तम

डबल चिनपासून मुक्त होण्यासाठी चेहऱ्याच्या काही सोपे आणि प्रभावी व्यायाम जाणून घेणे आवश्यक आहे. 
 
टेनिस बॉल वापरून देखील तुम्ही आपले अवयव टोन करु शकता. टेनिस बॉल डबल चिन पासून मुक्त होण्यासाठी देखील फायद्याचे आहे.
 
हा व्यायाम करण्यासाठी टेनिस बॉल हनुवटीच्या खाली ठेवा. बॉल आपल्या मानेजवळ ठेवा. तुमची हनुवटी बॉलवर घट्ट दाबा. 5 सेकंद थांबा. मग तुमची हनुवटी हलवा. प्रथम डाव्या बाजूची हनुवटी आणि नंतर उजवीकडील हनुवटी करा. हा व्यायाम 2 ते 3 मिनिटांसाठी करु शकता.
 
एका आणखी व्यायामात सरळ उभे रहा. मग टेनिस बॉल हनुवटीच्या खाली ठेवा. बॉलवर तुमची हनुवटी घट्ट दाबा. मग खाली पहा. प्रथम डाव्या बाजूची हनुवटी आणि नंतर उजवीकडील हनुवटी करा. हा व्यायाम 2 ते 3 मिनिटांसाठी करा.
 
चांगले परिणाम मिळविण्यासाठी हे दोन्ही व्यायाम आपण दररोज करु शकता. या व्यायामयाने हनुवटीखालील स्नायू टोन होण्यास मदत होऊ शकते. हे त्वचा टाइट करण्यास मदत करू शकते.