1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 मार्च 2021 (08:00 IST)

दह्याचे दररोज सेवन केल्याचे फायदे जाणून घ्या

उन्हाळा आल्यावर काही थंड खावेसे वाटते. या मध्ये सर्वात आधी नाव घेतले जाते दह्याचे.दही हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या मध्ये असे पोषक घटक आहे ज्यांच्या मुळे शरीराला हायड्रेट ठेवतात.दह्याच्या नियमित सेवन केल्याने हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. चला तर मग जाणून घेऊ या दह्याचे फायदे काय आहेत.  
 
* दह्याचे नियमित सेवन केल्याने पोटाची उष्णता कमी होते. परंतु रात्री दह्याचे सेवन करू नये. 
 
* प्रतिकारक शक्ती वाढविण्यात सहायक आहे .या मध्ये चांगले बेक्टेरिया आढळतात जे शरीरात पांढऱ्या रक्त पेशींना वाढवतात. या पेशी संसर्गापासून शरीराला सुरक्षित ठेवते. या कारणामुळे दही प्रतिकारक क्षमता वाढविणारे खाद्य पदार्थाच्या रूपात सेवन केले जात आहे.  
 
* त्वचेचे सौंदर्य वाढवते दही हे त्वचे चे सौंदर्य वाढवतात .दह्याचे  सेवन केल्याने आणि त्वचेवर लावल्याने फायदे  मिळतात. ब्लिच म्हणून देखील आपण दही वापरू शकतो. या मुळे त्वचेचा रंग उजळतो.  
 
* पचन मध्ये सुधारणा करतो. दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक पचन तंत्राला सुधारून पोट हलकं ठेवतो. याच कारणा मुळे जेवताना लोक दह्याचे सेवन करतात.
 
* हृदयासाठी फायदेशीर दही दररोज दह्याचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. या मुळे हृदय विकार होण्याचा धोका देखील कमी होतो.