बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020 (16:10 IST)

मधुमेहाचे रुग्ण असाल तर दिवाळीत आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 टिप्स जाणून घ्या

दिवाळीचा सण आपल्या सह भरपूर आनंद आणि भरपूर गोड जिन्नस घेऊन येतो. घरोघरी विविध प्रकारचे गोड-धोड केले जातात. दिवाळीचा सण आणि गोडापासून अंतर राखायचे हे अशक्य तर नाही पण अवघड आहे. या आनंदाचा सणाला लोक पोट आणि मन भरून गोड धोड खातात, पण याचा परिणाम त्यांचा आरोग्यावर पडतो हे विसरतात. म्हणून जर एखादी व्यक्ती मधुमेहाने किंवा इतर आरोग्याच्या त्रासाने ग्रस्त आहे, तर आरोग्याची काळजी घेणं आणि निरोगी दिवाळी साजरी करण आवश्यक ठरेल.चला तर मग आपण जाणून घेऊ या की निरोगी दिवाळी कशी साजरी करायची ते.
 
1 दिवाळीला खाद्य पदार्थांना नाही म्हणू नका, पण घेताना हे लक्षात घ्या की आपण जे पदार्थ खाण्यासाठी घेत आहोत त्यामध्ये जास्तीची कॅलरी नसावी.
 
2 बाजारपेठेतील मिठाई पासून अंतर राखा कारण या मधील साखरेचे प्रमाण आपल्याला माहीत नाही. शुगरफ्री मिठाई असल्यास तर ठीक आहे, पण त्याची देखील काळजी घ्या. मिठाईचे अति सेवन करू नका.
 
3 घरात बनवलेले गोड किंवा मिठाई चांगली असते जर आपण या मध्ये कृत्रिम पदार्थापासून बनवलेली साखर वापरू नये आणि साखर मुक्त मिठाई असेल तर अति उत्तम.
 
4 पक्वान्न आणि मिठाईच्या काळात आपल्या औषधांना विसरता कामा नये. वेळेवर न विसरता औषध आणि निरोगी फॅट आणि ओमेगा 3च्या वस्तू जसे - अळशी, हिरवे सॅलड, बदाम, सालमन आणि टूना मासे देखील आपण घेऊ शकता. कारल्याचा रस घेणं आपल्या साखरेच्या पातळीला नियंत्रित करण्यासाठी आवश्यक आहे.

5 व्यायाम करणे महत्त्वाचे आहे हे विसरता कामा नये. नियमितपणे व्यायाम करणे कॅलोरी जाळण्यासाठी मदत करत आणि साखरेची पातळी देखील नियंत्रित करत. हे दुर्लक्षित करू नका.