शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (15:47 IST)

Medication Safety Tips औषधासोबत या गोष्टींचे सेवन करू नका, आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात

निरोगी राहण्यासाठी जीवनशैली चांगली असणे आवश्यक आहे. योगासने आणि व्यायामासोबतच पौष्टिक आहाराचा परिणाम व्यक्तीच्या आरोग्यावर होतो. मात्र, मौसमी आजार, संसर्ग, अन्न आणि खराब जीवनशैलीमुळे अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. आजारी पडल्यावर लोक डॉक्टरांकडे जातात औषधे घेतात. पण जर तुम्हाला वाटत असेल की फक्त औषध घेऊन तुम्ही निरोगी राहू शकता तर हे चुकीचे ठरु शकतं कारण कधीकधी औषधाचे दुष्परिणाम होतात म्हणजे औषधांमुळेही हानी होऊ शकते कारण अनेक लोकांना औषध घेण्याच्या योग्य पद्धतीबद्दल माहिती नसतं. अशा स्थितीत औषध रोगावर प्रभाव टाकत नाही. अशा परिस्थितीत औषध घेताना काही खबरदारी घेेेेेेेण्याची गरज असते. चला तर जाणून घेऊया औषधासोबत कोणकोणत्या गोष्टी चुकूनही खाऊ नये, नाहीतर साइड इफेक्ट्स देखील होऊ शकतात.
 
एनर्जी ड्रिंक्स
कोणत्याही आजारावर औषध घेताना त्यासोबत एनर्जी ड्रिंक घेऊ नये. एनर्जी ड्रिंक्ससोबत औषध घेतल्याने शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात. तसेच औषध विरघळण्यास जास्त वेळ लागतो.
 
दारू
धूम्रपान शरीरासाठी हानिकारक आहे. औषधासोबत अल्कोहोल किंवा कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ सेवन करू नये. याचा आरोग्यावर वाईट परिणाम तर होतोच, सोबतच दोन्ही एकत्र सेवन केल्याने यकृतालाही खूप नुकसान होऊ शकते. अल्कोहोलसोबत औषध घेतल्याने यकृताच्या अनेक विकारांचा धोका वाढतो.
 
दुग्ध उत्पादने
अनेकदा लोक औषध दुधासोबत घेतात. दूध आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी ते काही प्रतिजैविकांचा प्रभावही कमी करू शकते. दुधात कॅल्शियम, मॅग्नेशियम, खनिजे आणि प्रथिने आढळतात, जे औषधांमध्ये मिसळल्यास औषधाचा प्रभाव कमी होतो. डॉक्टरांच्या मते, दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन अँटिबायोटिक्ससोबत करू नये.
 
मुलेठी 
आयुर्वेदात मुलेठी हे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. लिकोरिस पाचन तंत्र मजबूत करते आणि पोटाशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम देते. परंतु लिकोरिसमध्ये ग्लायसिरीझिन आढळते, ज्यामुळे अनेक औषधांचा प्रभाव कमी होतो.