शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (20:49 IST)

हरभराडाळीचे पाणी प्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवा वजन नियंत्रित करा

निरोगी राहण्यासाठी  निरोगी आहार घेणे महत्त्वाचे आहे. या मुळे शरीराला पोषण मिळते आणि शरीर निरोगी राहते. तज्ज्ञ सांगतात की मूठभर हरभरा खाल्ल्याने  प्रतिकारक शक्ती वाढते. या सह त्याचे पाणी देखील खूप फायदेशीर आहे. चला तर मग त्याचे फायदे जाणून घेऊ या.
हरभऱ्यामध्येकॅल्शियम,व्हिटॅमिन,प्रथिन,कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, फायबर, आयरन, अँटी ऑक्सीडेन्टचे गुणधर्म आढळतात. म्हणून ह्याचे सेवन करणे फायदेशीर आहे. 
 
* मधुमेहात फायदेशीर -
मधुमेहाच्या रुग्णांसाठी हरभऱ्याचे पाणी पिणं फायदेशीर आहे. दररोज सकाळी अनोश्यापोटी पाणी प्यायल्यानं रक्तातील साखर नियंत्रित राहते. वारंवार लघवी येण्याची समस्या देखील कमी होते.
 
कसं सेवन करावं  
रात्री 25 ग्राम हरभरे पाण्यात भिजत घाला. सकाळी हे पाणी गाळून थोडस मेथीदाणे घालून प्यावं. 
 
* पोटाचे त्रास दूर होतील-
आजच्या काळात प्रत्येक जण पोटाच्या त्रासाने त्रस्त आहे. गॅस,बद्धकोष्ठता, ऍसिडिटी चा त्रास असल्यास हरभऱ्याचे पाणी प्यावं. ह्याच्या सेवनाने पचन तंत्र बळकट होईल. पोटाच्या समस्येपासून आराम मिळेल. 
 
कसं सेवन करावं -
रात्रभर काळे हरभरे भिजत घालून सकाळी गाळून घ्या. एका वाटीत 1 आल्याच्या तुकडा,चवीप्रमाणे मीठ,जिरे वाटून घ्या. हे मिश्रण हरभऱ्याच्या पाण्यात मिसळून प्यावं.
 
* रोग प्रतिकारक शक्ती वाढवते-
रोग प्रतिकारक शक्ती कमी असल्यास वारंवार आजार होण्याचा धोका वाढतो. या साठी पोषक घटकांनी समृद्ध असलेल्या हरभराडाळीच्या पाण्याचे सेवन करावं. या मुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि हंगामी रोग होण्याचा धोका कमी होतो. 
 
कसं सेवन करावं -
रात्र भर हरभरे पाण्यात भिजत ठेवा. सकाळी गाळून अनोश्या पोटी पाणी प्यावं. 
हरभरे सकाळी उकळवून तयार पाण्याचे सेवन करावं.
 
* वजन नियंत्रित करण्यासाठी -
लठ्ठपणा प्रत्येक आजाराला कारणीभूत आहे. वजनावर नियंत्रण केल्यानं कोणता ही गंभीर आजार होण्यापासून वाचू  शकतो. या साठी पोषक घटकांनी समृद्ध असलेल्या हरभऱ्याच्या पाण्याचे सेवन करणे योग्य पर्याय आहे. हे पोट,मांडी, कंबरेवर जमा होणाऱ्या अतिरिक्त चरबीला कमी करून शरीराला योग्य आकार देण्यात मदत करतो. 
 
कसं सेवन करावं - 
रात्रभर हरभरा भिजत घालून सकाळी कुकरमध्ये  1-2 शिटी द्या. या पाण्याला वेगळे करून या मध्ये  काळेमीठ,ओवा,जिरे आणि हळद मिसळा. तयार पाणी अनोश्या पोटी प्या. या मुळे पोटाची चरबी द्रुतगतीने कमी होऊन योग्य वजन मिळण्यात मदत मिळेल.