1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (21:15 IST)

पोटाच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी या 5 घरगुती उपायांचे अनुसरणं करा

home remidedies for healthy  stomach health tips in marathi  healthya stomach home remedies
असे म्हणतात की निरोगी राहण्यासाठी पोट निरोगी राहणे देखील आवश्यक आहे.आजच्या जीवनशैलीला बघून पोटाची समस्यां सामान्य झाली आहे. पोटात दुखणे, ऍसिडिटी, खाण्या-पिण्याकडे लक्ष न देणे,बाहेर चे खाणे, योग्य वेळी जेवण न करणे इत्यादी कारणांमुळे पोटदुखी ची समस्यां उद्भवते. जे इतर आजारांना आमंत्रण देते. म्हणून म्हणतात की जर आरोग्य चांगले हवे असल्यास पोट योग्य असणे महत्त्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊ या की काही घरगुती उपायांना अवलंबवून पोटाच्या समस्येपासून कसा आराम मिळेल. 
 
* गरम पाणी -
जर आपल्याला पोटाची तक्रार सतत असल्यास सकाळी गरम पाणी पिण्याची सवय करा. आपण गरम पाण्यात लिंबाचा रस मिसळून देखील पिऊ शकता. हे आपल्याला पोटाच्या समस्येपासून आराम मिळविण्यास मदत करेल.
 
* ओवा -
ओव्याचा वापर पोटाच्या समस्येपासून आराम मिळविण्यासाठी फायदेशीर आहे. जर आपल्याला ऍसिडिटीचा त्रास आहे तर ओव्याचे सेवन आवर्जून करा.हे पोट्याच्या समस्येपासून आराम देईल. आपण ओवा गरम तव्यावर भाजून त्यामध्ये काळेमीठ घालून खाऊ शकता. पोटाच्या समस्येपासून मुक्तता मिळविण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे.
 
* बडी शोप-
ऍसिडिटीचा त्रास असल्यास बडी शोपचे सेवन केल्यानं आराम मिळतो. या साठी आपण जेवल्यानंतर अर्धा चमचा शोप खाऊ शकता.   
 
* लवंग - 
लवंगाचे सेवन पोटाच्या ऍसिडिटी ला कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.लवंग पचन तंत्र सुरळीत ठेवते आणि ह्याच्या सेवनाने पोटाच्या तक्रारी पासून आराम मिळेल. 
 
* डॉक्टरांशी संपर्क करा-
सर्व प्रयोग करून देखील पोटाची समस्या तशीच असेल तर त्वरितच डॉक्टरांशी संपर्क साधावे.