गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (08:15 IST)

महिलांसाठी काही आरोग्य टिप्स

-
 
* जास्तीत जास्त फळ आणि भाज्या खाव्या. 
* पांढऱ्या तांदुळाच्या ऐवजी ब्राऊन राईस वापरा. मैद्याच्या ऐवजी  गव्हाने बनलेला पास्ता खा.  
* कोंबडी, मासे, शेंगा आणि फरसबी सारखे प्रथिने निवडा.
* प्रोसेस्ड फूड, साखर,मिठाचे अत्यधिक सेवन करू नका.
 
*  दररोज व्यायाम करा -
व्यायाम करणे शरीराला ऊर्जावान आणि सक्रिय बनवत. हृदयाला निरोगी ठेवत आणि स्नायूंना आणि हाडाला बळकट करत. सर्व आजारांना दूर करत. 
* आठवड्यातून किमान 2 ते 4 तास धावणे किंवा नृत्य करणे सारखे व्यायाम करा. 
 
* पायी चाला शक्य असल्यास संपूर्ण दिवसात किमान 10,000
पाऊले चाला. लिफ्ट ऐवजी पायऱ्यांचा वापर करा.
 
* तणाव कमी घ्या -शक्य असल्यास तणाव कमी घ्या.
 
* डायटिंग बंद करा - निरोगी आहार घेणं म्हणजे डायटिंग करणे नाही.योग्य आणि पुरेसा आहार घ्या. प्रथिन, हेल्थी फॅट,कार्ब्स,आणि फायबर आपल्या आहारात घ्या.
 
* जास्त प्रमाणात कॅल्शियम घेऊ नये- अत्यधिक कॅल्शियमने  मूतखडा सारखे त्रास उद्भवतात.
 
* पुरेशी झोप घ्या - पुरेशी झोप न घेतल्यानं हृदय विकार उद्भवू शकतात.
 
* मद्यपान आणि धूम्रपान करू नये- मद्यपान करू नये. या मुळे  कर्क रोग सारखे आजार होतात. तसेच हृदय विकाराचा झटका देखील येऊ शकतो. 
 
* तोंडाची स्वच्छता ठेवा -सकाळी उठल्यावर आधी दात स्वच्छ करा नंतर चहा घ्या.